Sangvi : टास्कच्या बहाण्याने महिलेची साडेतीन लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – टास्क पूर्ण केल्यास अधिकचा मोबदला देण्याचे आमिष दाखवून महिलेकडून पैसे घेत तिची तीन लाख 45 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार 2 मार्च ते 28 एप्रिल या कालावधीत सांगवी येथे घडला. 
याप्रकरणी 34 वर्षीय महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद(Sangvi) दिली आहे. त्यानुसार अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Alandi : पिस्तूल बाळगल्या प्रकरणी तरुणास अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपींनी फिर्यादीशी टेलिग्राम वरून संपर्क करून त्यांना टास्क पूर्ण केल्यास अधिकचा मोबदला देतो असे आमिष दाखवले. फिर्यादी महिलेचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून वेगवेगळ्या टास्कसाठी तीन लाख 45 हजार रुपये घेतले. त्यानंतर त्यांना कोणताही परतावा न देता तसेच त्यांची रक्कम परत न करता त्यांची आर्थिक फसवणूक(Sangvi) करण्यात आली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.