Vadgaon : पीएमपी बस प्रवासात विसरलेला मोबाईल प्रवाशाला सुपूर्त

एमपीसी न्यूज – वाहकाच्या प्रामाणिकपणामुळे निगडी ते वडगाव बस प्रवासादरम्यान हरवलेला मोबाईल प्रवाशाला परत मिळाला. पीएमपीच्या कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या या प्रामाणिकपणाबद्दल प्रवाशांकडून(Vadgaon) कौतुक केले जात आहे.

 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, बस प्रवासी विलास फडके हे निगडी-वडगाव या बसने प्रवास करीत होते. ते निगडी येथून बसमध्ये बसले. त्यानंतर रस्त्यात ते त्यांच्या गंतव्य ठिकाणी उतरले. प्रवासात त्यांचा 16 हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन विसरला. बस वडगाव येथे पोहोचल्यानंतर वाहक प्रमोद डिके यांना हा मोबाईल फोन सापडला. त्यांनी प्रामाणिकपणे मोबाईल फोन वडगाव येथील अधिकारी चंद्रकांत गराडे यांच्याकडे दिला.

 

प्रवासी विलास फडके यांनी वडगाव बस स्टॉपवर चौकशी केली असता वाहक प्रमोद डिके यांनी मोबाईल फोन चंद्रकांत गराडे यांच्याकडे सुपूर्त केला असल्याचे समजले. त्यानंतर चंद्रकांत गराडे, बस चालक दत्तात्रय परब आणि प्रमोद डिके यांच्या हस्ते फडके यांना त्यांचा मोबाईल फोन सुपूर्त करण्यात आला.

पीएमपीच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी दाखविलेल्या या प्रामाणिकपणाबद्दल प्रवाशांकडून(Vadgaon) त्यांचे कौतुक केले जात आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.