Pune: पुणे ‘हिट अँड रन’ जामीनप्रकरणी सत्र न्यायालयात याचिका दाखल करणार- पुणे पोलीस आयुक्त

एमपीसीन्यूज – पुणे येथे (Pune)शनिवारी  रात्री धक्कादायक घटना घडली होती. शनिवारी मध्यरात्री कल्याणीनगर येथे पार्टी करुन जात असलेल्या तरुणाच्या भरधाव गाडीने 2 जणांना चिरडलं होत. या अपघातात अनिस अवधिया आणि त्याची मैत्रीण अश्विनी कोस्टा यांचा मृत्यू झाला.या प्रकरणी “त्या” 17 वर्षीय अल्पवयीन तरुणाला बाल न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे.

पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी म्हटले आहे की, “या घटनेमधील आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला जामीन मिळाला. मात्र आम्ही याविरोधात सत्र न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत. मुलाचे वडील आणि त्याला दारु विकणाऱ्या पब मारकावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.तसेच कल्याणी नगर, कोरेगाव पार्क भागातील पब आणि बारवर कारवाई करण्यासाठी एक्स्ईज डिपार्टमेंट बरोबर संबधित तत्परतेने काम करण्यात येईल”.

या प्रकरणात पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेजचाही तपास करण्यात येत असून कोणी राजकीय दबाव आणलेला आहे का हे यातून समजेल. या घटनेशी संबंधित कोझी बार आणि ब्लॅक बार या दोन्ही बारचालकांवर कारवाई करण्यात येईल. तसेच शनिवारी रात्री मद्यधुंद अवस्थेत गाडी चालविणारा खरंच अल्पवयीन आहे का याचा तपास त्याच्या शाळेत जाऊन शहानिशा करण्यात येत आहे. विना नंबर प्लेट गाडी देणाऱ्या डीलरवर देखील कारवाई करण्यात येत असून या घटनेतील दोषींपैकी कोणालाही वाचवण्यात येणार नाही,असे पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस आयुक्तांकडे सोपविण्यात आला आहे असेही सांगितले गेले.

पोलिसांनी अल्पवयीन आरोपीवर(Pune) गुन्हा दाखल करत त्याला बाल न्यायालयात दाखल केले होते.यावर न्यायालयाने तो अल्पवयीन असून त्याच्यावर लावण्यात आलेल कलम हे जामीन पात्र असल्यामुळं त्याला काही प्रमुख अटींवर जामीन मंजूर केला आहे.

Talegaon Dabhade – रविकांत अचिवर्स स्पोर्ट्स अकॅडमीच्या उन्हाळी प्रशिक्षण शिबिराची सांगता

या अटीवर जामीन मंजूर करण्यात आला

अल्पवयीन आरोपीला वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांसोबत पुढील पंधरा दिवस रस्त्यावर थांबून वाहतुकीचे नियोजन करावे लागणार.
अल्पवयीन तरुणाला मानसोपचार तज्ञांकडून उपचार घ्यावे लागणार आहे.
भविष्यात त्याच्या हातून कुठलाही अपघात घडला, तर अपघातग्रस्तांना मदत करावी लागणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.