Nigdi : भगवान महावीर यांनी दाखवलेला शांतता व अहिंसेचा मार्ग आजही प्रेरक – बारणे

भगवान महावीर यांना अभिवादन करीत बारणे यांनी दिल्या जैन बांधवांना शुभेच्छा

एमपीसी न्यूज – भगवान महावीर यांनी दाखवलेला शांतता व अहिंसेचा मार्ग समाजासाठी आजही प्रेरक आहे, असे उद्गार मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप- राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी आज (रविवारी) काढले.

 

भगवान महावीर जयंती निमित्त बारणे यांनी आकुर्डी-निगडी- प्राधिकरण जैन श्रावक संघाने(Nigdi) आयोजित केलेल्या कार्यक्रमास तसेच निगडी प्राधिकरण येथील भगवान महावीर अहिंसा ट्रस्टच्या दिगंबर जैन मंदिरात जाऊन दर्शन घेतले व जैन बांधवांना शुभेच्छा दिल्या. त्यावेळी माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे, तानाजी बारणे, मयूर बारणे, धनाजी गुजर आणि गौरव जाधव आदी उपस्थित होते.

 

खासदार बारणे म्हणाले की, भगवान महावीर यांनी दिलेल्या शिकवणीचे पालन करीत अहिंसा व शांततेच्या मार्गाने जैन समाज व्यवसाय करून समाजाला प्रेरणा देण्याचे काम करत आहे. समाजाच्या विकासात जैन बांधवांचे (Nigdi) योगदान मोठे आहे. आकुर्डी येथील कार्यक्रमात जैन श्रावक संघाच्या वतीने सुभाष ललवानी, नितीन बेदमुथा, संतोष कर्नावट यांनी बारणे यांचे स्वागत व सत्कार केला.

 

निगडी प्राधिकरण येथील दिगंबर जैन मंदिरात भगवान महावीर अहिंसा ट्रस्टचे अध्यक्ष अजित पाटील यांनी बारणे यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यावेळी कैलास पांडे, वर्धमान पांडे, सुदीन खोत यांच्यासह जैन बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महावीर जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरासही बारणे यांनी भेट दिली व सर्व रक्तदात्यांचे अभिनंदन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.