Today’s Horoscope 04 May 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज –  Today’s Horoscope 04 May 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग

आजचा दिवस – शनिवार.

तारीख – 04.05.2024.

शुभाशुभ विचार – 11 पर्यंत चांगला दिवस.

आज विशेष – वरुथिनी एकादशी.

राहू काळ – सकाळी 9.00 ते 10.30.

दिशा शूल – पूर्वेस असेल.

आज नक्षत्र – पूर्वा भाद्रपदा 22.07 पर्यंत नंतर उत्तरा भाद्रपदा.

चंद्र राशी – कुंभ 16.38 पर्यंत नंतर मीन.
—————————–
मेष ( शुभ रंग- मरून)

एखाद्या नवीन उपक्रमाचा श्री गणेशा आज दुपार पूर्वीच करून घ्या. हार्ड वर्क पेक्षा स्मार्टवर्क करून कामे लवकर उरकता येतील. आज काही अपुरी स्वप्न साकार होतील.

वृषभ (शुभ रंग- पिस्ता)

वेळीच घेतलेल्या योग्य निर्णयामुळे कार्यक्षेत्रात यशाचा मार्ग सोपा होईल. आज कर्तव्याला प्राधान्य देणे गरजेचे आहे. रिकामटेकड्या मित्रमंडळींना दुरूनच राम राम करा.

मिथुन (शुभ रंग – पांढरा)

कार्यक्षेत्रात वाढत्या जबाबदाऱ्यांचे दडपण येण्याची शक्यता आहे. बेकायदेशीर कृत्ये अंगाशी येऊ शकतील. सरकारी नियमांचे उल्लंघन करू नका. नाकासमोर चालणे हिताचे.

कर्क ( शुभ रंग- क्रीम)

आज कोणतीही धाडसाची कामे तसेच मोठे आर्थिक व्यवहार टाळावेत. कामगार वर्गाने स्वतःच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे. हातचे सोडून पळत्या मागे जाऊ नका.

सिंह ( शुभ रंग- लाल)

नोकरीच्या ठिकाणी आज कामाचा ताण कितीही वाढला तरीही वरिष्ठांचे सहकार्य राहील. घरात जोडीदारा कडूनही तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील. आज काही शुभ समाचार येतील.

कन्या (शुभ रंग- स्ट्रॉबेरी )

नोकरदारांना आज वरिष्ठ गोड बोलून राबवून घेतील. काही आरोग्यविषयक समस्यांवर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. आज कुणालाही सल्ले देऊ नका.

तूळ (शुभ रंग- आकाशी)

आज तुमच्यात चैनी व विलासी वृत्ती बळावेल. कमी श्रमात जास्त लाभाची स्वप्न पहाल. आज मौज मजेला तुमचे प्रथम प्राधान्य राहील. प्रकृती उत्तम साथ देईल.

वृश्चिक ( शुभ रंग- जांभळा)

बरेच दिवसापासून रखडलेल्या घरगुती कामात आज लक्ष देणे गरजेचे आहे. गृह उद्योग करणाऱ्या महिलांची मिळकत चांगली असेल. मुले आज मन लावून अभ्यास करतील.

धनु (शुभ रंग- जांभळा)

अहंकाराला थारा देऊ नका. गोड बोलूनच अनेक अवघड कामे सोपी होतील. शेजारी आज आपलेपणानेच डोकावतील. आज महत्त्वाचे निर्णय अनुभवींच्या सल्ल्याने घ्यावेत.

मकर (शुभ रंग- भगवा)

व्यवसायात उत्तम आर्थिक यश मिळून स्वतःचे वेगळेच स्थान निर्माण कराल. आज तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रातील नवोदित मंडळींना ही योग्य मार्गदर्शन करू शकाल.

कुंभ ( शुभ रंग- निळा)

आज तुम्ही काहीसे बेफिकीरपणे वागाल. स्वतःचेच खरे करण्याकडे तुमचा कल असेल. आज तुम्ही अति उत्साहाच्या भरात काही चुकीचे निर्णय घ्याल.

मीन ( शुभ रंग- डाळिंबी)

अनावश्यक खर्चावर लगाम घालण्याची गरज आहे. आज दिवसाच्या उत्तरार्धात काही अत्यावश्यक खर्च हात जोडून उभे राहू शकतात. काही अनपेक्षित घटना घडतील.

शुभम भवतु

श्री जयंत कुलकर्णी.

 ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार

9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.