Pune : इंडिया आघाडीचं सरकार आलं तर देशात असलेली  50 टक्के आरक्षणाची मर्यादा हटवू – राहुल गांधी

एमपीसी न्यूज – लोकसभा निवडणुकीनंतर देशात इंडिया आघाडीचं सरकार आलं तर देशात ( Pune) असलेली  50 टक्के आरक्षणाची मर्यादा हटवून टाकणार, अशी मोठी घोषणा राहुल गांधी यांनी काल केली.काँग्रेसचे पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचाराच्या निमित्ताने राहुल गांधी यांची काल पुण्यात सभा पार पडली. या सभेत राहुल गांधी यांनी मोठी घोषणा केली.

कधी त्यांचे नेता संविधान बदलण्याबद्दल बोलतात, तर कधी बोलतात की, आरक्षण संपवून टाकणार. मोदींनी फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्यावं, हे 50 टक्के आरक्षणाची मर्यादा आहे, ही मर्यादा त्यांनी कुठेही सांगावं की, ते 50 टक्के आरक्षणाची मर्यादा हटवून टाकणार. त्यांनी कुठेही जावून सांगावं. आम्ही निर्णय घेतला आहे की, निवडणुकीनंतर आम्ही ही मर्यादा, ज्यामुळे कोट्यवधी नागरिकांचं नुकसान होत आहे, 50 टक्क्यांची मर्यादा आम्ही तोडून टाकू आणि बाहेर फेकून देऊ”, असं राहुल गांधी म्हणाले.

Today’s Horoscope 04 May 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

नरेंद्र मोदी आणि भाजपला संविधान मिटवायचं आहे, असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला.लढाई संविधानाला वाचवण्यासाठी आहे. एकीकडे काँग्रेस पक्ष, इंडिया आघाडी आहे, संविधान, लोकशाहीला वाचवण्यासाठी लागली आहे. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी, आरएसएस संविधानाला खतम करु इच्छित आहेत. हे संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलं आहे. या संविधानात महात्मा फुले यांचे विचार आहेत. महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरु ज्यांनी मिळून हिंदुस्तानच्या जनतेसोबत वर्षानुवर्षे लढाई करुन देशाच्या जनतेला दिलं. संविधानाला नरेंद्र मोदी आणि भाजप बदलण्यासाठी इच्छुक आहेत”, असा आरोप राहुल गांधी यांनी ( Pune) केला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.