Pune : पत्नी व सासूला धडा शिकवण्यासाठी 15 दुचाकी जाळल्या

एमपीसी न्यूज – पत्नीशी वाद झाल्याने सासूरवाडीत आलेल्या ( Pune ) एकाने सोसायटीच्या आवारातील 15 दुचाकी पेटवून दिल्याची घटना मध्यरात्री सिंहगड रस्ता भागातील वडगाव बुद्रुक परिसरात बुधवारी रात्री ही घटना घडली. 

याप्रकरणी गणेश दिनकर दहिभाते (वय 35) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका महिलेने   सिंहगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  फिर्यादी यांच्या मुलीचा गणेश याच्याशी काही वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्या दोघांच्यात वाद झाल्याने पत्नी माहेरी निघून आली होती.

Pune : इंडिया आघाडीचं सरकार आलं तर देशात असलेली  50 टक्के आरक्षणाची मर्यादा हटवू – राहुल गांधी

1 मे रोजी रात्री गणेश वडगाव बुद्रुकमधील सासूरवाडीत आला. गणेश सासूरवाडीत गेल्यानंतर त्याचा रात्री पुन्हा पत्नीशी वाद झाला. पत्नीला धडा शिकवण्यासाठी त्याने सासूची दुचाकी जाळली. त्यामुळे शेजारी लावलेल्या 14 दुचाकींनी पेट घेतला. आगीत 15 दुचाकी जळाल्या.

आरोपी गणेशने पत्नी आणि सासूला धडा शिकवण्यासाठी दुचाकी जाळली. काही क्षणात आग भडकली. सोसायटीच्या आवरात लावण्यात आलेल्या अन्य दुचाकींनी पेट घेतला. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली, अशी माहिती पोलिसांनी ( Pune ) दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.