Alandi : स्वतः तरतात आणि इतरांना तारतात त्यांना तीर्थंकर म्हणतात – जैन साधू प्रशांत ऋषीजी

एमपीसी न्यूज : आज (दि.21) रोजी आळंदी मध्ये जैनांचे चोविसावे तीर्थंकर श्रमण भगवान महावीर स्वामी यांचा 2622 वा जन्मकल्याणक महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. त्यानिमित्ताने आयोजित प्रवचनामध्ये धर्मप्रभावक वाणीभूषण प्रशांतऋषीजी यांनी भगवान महावीरांचे जीवन कसे समाजाभिमुख होते यावर आपले विचार मांडले.

 

पुढे बोलताना प्रशांतऋषीजी म्हणाले, संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या (Alandi) संजीवन समाधीने पावन झालेल्या या तीर्थात एका तीर्थंकराचा जन्मकल्याणक महोत्सवात मला सहभागी होता आले हे माझे परमभाग्य आहे. स्वतः तरतात आणि इतरांना तारतात त्यांना तीर्थंकर म्हणतात. भगवान महावीर यांनी समाजातील  दीन-दुबळे, गोरगरीब यांच्या जीवनाचा उद्धार करण्याकरीता कार्य केले .त्यांचाच आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवून आपण “महावीर की रोटी “हा उपक्रम चालू करावा असे आव्हान त्यांनी समाज बांधवांना केले. या उपक्रमाच्या माध्यमातून समाजातील दिनदुबळ्या,गरजूंना अन्नदान करावे. या त्यांच्या आव्हानास सकाळ जैन संघाने  प्रतिसाद देत या वर्षापासून दर महिन्याला एक दिवस “महावीर की रोटी”हा उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मे महिन्यात पाच तारखेला स्व. कांतीलालजी चोरडिया यांच्या स्मरणार्थ त्या दिवसाचा” महावीर की रोटी” उपक्रमाचा खर्च सतीश चोरडिया व परिवाराने उचलला.

 

 

यानिमित्ताने भगवान महावीर यांचे 27 भव म्हणजे जन्म यावर बायोग्राफी तनुजा लुनावत व सारिका कटारिया यांनी पाठशाळेतील बालकलाकारांकडून सादर केली. महिला मंडळाने महावीरांच्या जीवनावर नाटिका सादर केली. संपूर्ण कार्यक्रमाचे सूञसंचालन सौ. ज्योती चोरडिया यांनी केले. यानिमित्ताने जीवदया उपक्रमांतर्गत जमा झालेला रु. 5100/-चा निधी डॉ. मंजुश्रीजी महाराज प्रणित भिवरी येथील गोशाळेत देण्यात आला. संघातर्फे प्रशांतऋषीजी म. यांचे मरकळ येथील वैराग्य आनंद तीर्थला 11000/- रु. देणगी देण्यात आली.

 

                 

 

या निमित्ताने सकाळी आठ वाजता भगवान महावीर यांची प्रतिमेची भव्य मिरवणूक आळंदी शहरातून बँडच्या वाद्यांच्या तालासुरात व गजरात काढण्यात आली. आळंदी श्वेतांबर स्थानकवासी जैन संघाचे अध्यक्ष सुरेश वडगावकर, उपाध्यक्ष सतीश चोरडिया, माजी नगराध्यक्ष शारदाताई वडगावकर, मा. नगरसेवक अशोक उमरगेकर,श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर ,ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, काँग्रेस सेलचे राज्याध्यक्ष डॉ.मनोज रांका, मदनलाल बोरुंदिया,मोहनलाल चोपडा ,संघाचे विश्वस्त राजेंद्र धोका, रमेश नवलाखा, राजेंद्र चोपडा ,प्रमोद बाफना, राजेंद्र लोढा, सागर बागमार, श्याम कोलन, सचिन बोरूंदिया, दिलीप नहार  व जैन समाज मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी होता.

 

या मार्गात ठिकठिकाणी  मिरवणुकीचे स्वागत व महावीरांच्या प्रतिमेला वंदन करण्यात आले. आळंदी पोलीस स्टेशनचे व. पो. निरीक्षक हरी नरके व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.