Chinchwad : श्री आदिश्वरजी जैन श्वेतांबर ट्रस्ट तर्फे “भगवान महावीर जन्म कल्याणक” या कार्यक्रमाची रथयात्रा संपन्न

एमपीसी न्यूज – भगवान महावीर यांच्या दोन हजार 622 जन्म कल्याणक निमित्त श्री आदिश्वरजी जैन श्वेतांबर ट्रस्ट तर्फे रथयात्रा काढण्यात आली. रविवारी (दि. 21) काढण्यात आलेल्या या रथयात्रेत(Chinchwad) जैन बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले.

 

श्री आदिश्वरजी जैन श्वेतांबर ट्रस्टचे अध्यक्ष(Chinchwad) तुषार धनराज रांका, उपाध्यक्ष इंदरचंद बस्तीमल पुनमिया, सचिव मुकेश जावंतराज सोनिगरा, खजिनदार अल्पेश लालचंद सोलंकी, सहसचिव विनोद खुबीलाल जैन, सह खजिनदार राजकुमार नेमीचंद रांका, विश्वस्त सुनील मदनलाल सोनिगरा आदी यावेळी उपस्थित होते.

 

Mahavir Janma Kalyanak : भगवान महावीर जयंती विशेष; मोक्ष प्राप्तीची भगवान महावीर यांची त्रिसूत्री

भगवान महावीर जन्म कल्याणक कार्यक्रमात कुत्रा, कबूतर व इतर प्राण्यांना दान स्वरूपात अन्नदान देण्यात आले. ही रथयात्रा चिंचवड स्टेशन चौक ते भगवान महावीर चौक दरम्यान काढण्यात आली. रथ यात्रेत जैन धर्मध्वज आणि सुंदर फुलांची आरास करण्यात आली. कार्यक्रमात 101 किलो बुंदीचे लाडू वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम दरवर्षी होत असून यंदाचा हा 2622 वा हा कार्यक्रम आहे.या रथयात्रेत मोठ्या संख्येने पुरुष, महिला व शेकडो नागरिक उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.