Alandi : सिद्धबेटात बांबू वृक्षांच्या परिसरात आग

एमपीसी न्यूज : आज दि.16 मार्च रोजी पहाटे 2 च्या सुमारास (Alandi) सिद्धबेट येथील बांबूच्या परिसरात समाजकंटकांकडून आग लावण्यात आली. त्या झाडांना आग लागल्याचे आळंदी पोलीस स्टेशन व साई समृद्धी सोसायटी मधील रहिवाशी यांच्याकडून पालिका, अग्निशमन दलास कळविण्यात आले.

Pune : विविध मागण्यासाठी प्राप्तिकर विभागाच्या कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

आळंदी नगरपरिषद अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन तेथील (Alandi) आग बकेटच्या सहाय्याने विझवली. तसेच आज सकाळी 10 च्या सुमारास तेथील बाबूंच्या परिसरात बांबूच्या खालील बाजूस (पहाटे लागलेल्या आगीमुळे) तेथून धूर निघत असल्याचे एका व्यक्तीस दिसले. त्याची माहिती पालिका अधिकाऱ्यास दिली. तत्पर बकेट व पाण्याच्या पाईप द्वारे बांबूच्या वृक्षांच्या परिसरात पालिका कर्मचाऱ्याने येऊन तिथे पाणी मारले. आज पहाटेच्या या लागलेल्या आगीमध्ये काही बाबूंच्या वृक्षांची हानी झालेली तिथे दिसून येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.