Pune : विविध मागण्यासाठी प्राप्तिकर विभागाच्या कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

एमपीसी न्यूज –  प्राप्तिकर विभागाच्या (Pune) देशभरातील कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले आहे. याचेच पडसाद म्हणून पुण्यातील मुख्य प्राप्तिकर आयुक्त कार्यालय आणि त्याअंतर्गत येणाऱ्या इतर कार्यालयातील मोठ्या संख्येने कर्मचारी यांनी काल (शुक्रवार) दुपारपासून कामावर बहिष्कार टाकला आहे.

कर्मचाऱ्यांनी तीन दिवस कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. याचबरोबर निदर्शने करण्यात आली. त्यानंतर हा बहिष्कार टाकण्यात आला आहे.

Maharashtra : राज्यातील शिक्षकांसाठी आता ड्रेसकोड, शिक्षण विभागाचे निर्देश

कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कार्यालयीन अधीक्षक (Pune) भरतीचे नवीन नियम सध्या सेवेत असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लागू करू नयेत. सध्या सेवेतील कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचा कालावधी 3 वर्षांचा आहे. नवीन भरती नियमानुसार हा कालावधी पदोन्नतीचा कालावधी 10 वर्षांवर जाणार आहे. याला कर्मचारी संघटनांचा विरोध आहे. यामुळे देशभरात प्राप्तिकर विभागाच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा कर्मचारी संघटनांनी दिला आहे.

https://www.youtube.com/watch?v=AhYwtbONGh8

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.