Maharashtra : राज्यातील शिक्षकांसाठी आता ड्रेसकोड, शिक्षण विभागाचे निर्देश

एमपीसी न्यूज – राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळांतील (Mahaarashtra) शिक्षकांसाठी ड्रेसकोड लागू करण्याचे निर्देश शालेय शिक्षण विभागाने दिले. शालेय शिक्षण विभागाने या संदर्भातील शासन निर्णय प्रसिद्ध केला.

शिक्षकाचा पेहराव अशोभनीय, अव्यवस्थित आणि अस्वच्छ असल्यास त्याचा अप्रत्यक्ष परिणाम त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर, तसेच विद्यार्थ्यांवर होतो असे नमूद करून शिक्षकांच्या पेहरावा संदर्भातील मार्गदर्शक सूचना शालेय शिक्षण विभागाने दिल्या आहेत.

Yerawada : येरवडा येथे लाकडी गोदामाला आग

पेहराव कसा असेल –

महिला शिक्षकांनी साडी, चुडीदार-सलवार, कुर्ता, दुपट्टा अशा पद्धतीने, तर पुरुष शिक्षकांनी शर्ट, ट्राउझर पँट, शर्ट इन करून पेहराव करावा. शाळेने शिक्षकांसाठी एकच ड्रेसकोड, परिधान करायच्या पेहरावाचा रंग निश्चित करावा, पेहरावाला शोभतील अशी पादत्राणे असावीत, वैद्यकीय कारण असल्यास पुरुष, महिला शिक्षकांना बूट घालण्यातून सवलत द्यावी, स्काऊट गाईडच्या शिक्षकांना स्काऊट गाईडचा पेहराव असेल, असे नमूद करण्यात आले आहे.

कोणता पेहराव नसावा (Maharashtra)

शिक्षकांनी गडद रंगाचे, चित्रविचित्र नक्षीकाम आणि चित्रे असलेले कपडे परिधान करू नयेत. तसेच शिक्षकांनी शाळेत जीन्स, टीशर्ट परिधान करू नये, असे नमूद करण्यात आले आहे.

या बरोबरच शाळांमध्ये कार्यरत शिक्षकांच्या नावामागे इंग्रजीत ‘टीआर’ आणि मराठीत ‘टि’ संबोधन लावण्यात यावे, या संदर्भातील बोधचिन्ह शिक्षण आयुक्त यांनी निश्चित करावे, हे संबोधन आणि बोधचिन्ह शिक्षकांना त्यांच्या वाहनावर लावता येईल, असेही स्पष्ट करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.