Maval Loksabha Election : रणरणत्या उन्हातही उरणमध्ये बारणे यांचा प्रचार उत्साहात

तापमान 42 अंशांवर असतानाही उरणमध्ये बारणे पोचले 50 गावांपर्यंत

एमपीसी न्यूज – कडक उन्हाळ्यात तापमान 42 अंशांवर गेलेले असतानाही मावळ लोकसभा मतदारसंघातील (Maval Loksabha Election) शिवसेना- भाजप- राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारातील उत्साह तसूभरही कमी झाला नसल्याचे आज (शनिवारी) पहायला मिळाले. रणरणत्या उन्हात बारणे यांनी उरण तालुक्यातील तब्बल पन्नास गावांपर्यंत जाऊन मतदारांशी संपर्क साधला.

 

 

खासदार बारणे यांनी उष्णतेच्या लाटेची पर्वा न करता उरण तालुक्याचा प्रचार दौरा केला. त्यांच्या समवेत आमदार महेश बालदी, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अतुल भगत, भाजपचे तालुकाध्यक्ष रवी भोईर, शिवसेना तालुकाप्रमुख महेंद्र पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस भार्गव पाटील, तालुकाध्यक्ष परीक्षित ठाकूर तसेच कौशिक शहा, जयवीन कोळी, जितेंद्र घरत, महेश कडू, शशी पाटील गोपीनाथ म्हात्रे, दीपक ठाकूर, संदेश म्हात्रे, संदेश ठाकूर, समद भोंगळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

 

Chinchwad : प्लास्टिक मुक्त वसुंधरेसाठी सर्वांनी सजग झाले पाहिजे – विनोद बोधनकर

 

रणरणत्या उन्हात उघड्या विजय रथावर उभे राहून खासदार बारणे मतदारांना नमस्कार करून व हात उंचावून अभिवादन करत होते. उन्हापासून रक्षणासाठी त्यांनी धनुष्यबाण चिन्ह असलेली भगवी टोपी परिधान केली होती. खासदार बारणे यांचा उत्साह पाहून अन्य पदाधिकारी कार्यकर्त्यांचा उत्साहही दुणावला. प्रचार फेरीच्या मार्गावर ठिकठिकाणी झाडांच्या सावलीला व आडोशाला उभे राहून लोक बारणे यांची वाट पाहत होते. फटाके वाजवून, फुलांच्या पाकळ्यांची उधळण करीत प्रत्येक गावात बारणे यांचे जंगी स्वागत करण्यात आले. प्रचार फेरीतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी ग्रामस्थांकडून थंड पाणी, सरबत, ताक यांची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे कार्यकर्त्यांना थोडासा थंडावा मिळत होता.

 

उरण तालुक्यातील मोरा येथून प्रचार फेरीला सुरुवात झाली. आमदार बंगला, गणपती चौक, करंजा, मुळेखंड, तेलीपडा, द्रोणागिरी नोड, बोकडविरा, फुंडे, डोंगरी, पाणजे, सोनारी, करळ, जसरखार, नवघर, भेंडखळ, खोपटे, कोप्रोली, पाणदिवे, पिरकोन, पाले, गोवळणे, आवरे, सारडे, वशेणी, पुनाडे, मोठीजुई, कळंबुसरे, चिरनेर, विंधणे, दिघोडे, वेश्वी, चिर्ले, शिव समर्थ संग्रहालय, जासई, गव्हाण, कोपर, शेलगर, न्हावा, नवा खाडी, डेल्टा, कोपर तला, बिकानेर सेक्टर 17, ठाकूर रेसिडेन्सी, भूमिपूजन भवन, बामण, डोंगरी गाव, सेक्टर 21 भाजप कार्यालय मार्गे करंजाडे सेक्टर 24 येथे प्रचार फेरीची सांगता (Maval Loksabha Election) झाली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.