Loksabha Election 2024 : पुणे शहर परिसरात अवकाश उड्डाणावर निर्बंध

एमपीसी न्यूज – पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघातील ( Loksabha Election 2024) प्रचार सभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येणार आहेत. पुणे शहरात त्यांची चारही लोकसभा मतदारसंघांसाठी प्रचार सभा होणार आहे. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. दरम्यान अवकाश उड्डाणांवर निर्बंध घालण्यात आले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 29 आणि 30 एप्रिल रोजी नियोजित पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अति महत्वाच्या व्यक्तींची सुरक्षा तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी 27 एप्रिल रोजी रात्री 12 वाजल्यापासून ते 30 एप्रिल रोजी रात्री 12 वाजेपर्यंत पुणे शहर परिसरात पॅराग्लायडींग, हॉट बलुन सफारी, ड्रोन, मायक्रोलाईट एअरोप्लेन इत्यादी प्रकारच्या अवकाश उड्डाणावर निर्बंध घालण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी जारी केले आहेत.

Loksabha Election 2024 : निवडणूक निरीक्षकांकडून जिल्ह्यातील निवडणूक तयारीचा आढावा

या आदेशाचे उल्लघंन करणाऱ्या व्यक्तींवर भारतीय दंड संहिता 1860 कलम 188 च्या दंडनियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही असेही जिल्हाधिकारी यांच्या आदेशात नमूद करण्यात आले ( Loksabha Election 2024) आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.