Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे नगर परिषदेकडून गत आर्थिक वर्षात 23 कोटी 3 लाखांची कर वसुली

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे  नगर परिषदेचे उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत असलेल्या (Talegaon Dabhade) मालमत्ता कराचे आर्थिक वर्ष 2023-24  मध्ये 32 कोटी 95  लाख वसुलीचे उद्दिष्ट होते. त्यापैकी शास तळेगाव दाभाडे  नगर परिषदे कीय कार्यालये, मोबाईल टॉवर व न्यायप्रविष्ट प्रकरणे यांची अनुक्रमे 39  लक्ष, 1 कोटी 12  लक्ष व 11 कोटी 74 लक्ष अशी एकूण 13  कोटी 25 लाख मागणी ही जप्ती व सीलची कारवाई करता येणार नसल्याने वसूल होऊ शकलेली नाही. उर्वरित वसूल पात्र रकमेच्या 89.79 टक्के कर वसुली करण्यात आली आहे.

वसूलपात्र 19  कोटी 70 लाख पैकी कर संकलन विभागाने 17  कोटी 69 लाख वसूल करून वसूलपात्र रकमेच्या 89.79  वसूली करण्यात यश मिळवले आहे. उर्वरित वसूलपात्र मागणी 19 कोटी 70 लाख पैकी कर संकलन विभागाने 17 कोटी 69 लाख वसूल करून वसूलपात्र रकमेच्या 89.79 वसूली करण्यात यश मिळवले आहे. या वर्षी शासनाच्या पूर्वपरवानगी शिवाय नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असलेल्या मोबाईल टॉवर्सवर मालमत्ता कराची वसूली अथवा इतर कारणास्तव टाळेबंदी (सील) अथवा निष्कासनाची कारवाई करण्यात येऊ नये असे आदेश असल्यामुळे तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीतील मोबाईल टॉवर वर कारवाई करता आलेली नाही. पाणीपुरवठा विभागाचे उद्दिष्ट हे 9 कोटी 4 लाख कोटी होते. त्यापैकी दुबार बिलांची मागणी 45 लाख इतकी वजा केले असता 8 कोटी 59 लाख ही सुधारित मागणीपैकी मार्च अखेर4  कोटी 87 लाख वसुली करून पाणीपट्टि कराची 56.694 वसूली करण्यात आलेली आहे.

दैनिक रोज भाडे व न. प. दुकान गाळे भाडे यांची 1 कोटी 2 लाख मागणी असून त्यापैकी 47 लक्ष वसूल करून 464 वसूली करण्यात आलेली आहे. मालमत्ता कर,पाणीपट्टि कर व दुकान गाळे व दैनिक रोजभाडे यांची न्यायाप्रविष्ट प्रकरणे व मोबाईल टॉवर यात गुंतलेली रक्कम वगळता एकूण 29 कोटी 37  लक्ष मागणीपैकी 23 कोटी 3  लक्ष वसूल करण्यात आलेले आहेत. एकंदरीत 78.454 करवसूली करण्यात तळेगाव दाभाडे कर संकलन विभागास यश आलेले आहे.

Pimpri : अतिउच्चदाबाच्या 400 केव्ही उपकेंद्रात बिघाड; पिंपरी, तळेगाव, चाकण परिसरात दीड तास वीजपुरवठा खंडित

कर वसूली करण्याकरिता तळेगाव दाभाडे नगरपरिषद मार्फत थकबाकी भरण्याबाबत जाहीर सूचना, सूचना फलक,घरभेटी व घरोघरी जाऊन थकबाकीदारांच्या घरासमोर ढोल वाजवणे, थकबाकीदारांची नांवे वर्तमानपत्रात प्रसिद्ध केलेलेआहेत. तसेच 41 मिळकती सील करण्यात आल्या असून त्यापैकी 13 मिळकतीचे थकबाकी भरल्यामुळे सील काढण्यात आले. तसेच 7 नळजोडण्या खंडित केलेल्या असून 1 नळजोडणी थकबाकी भरल्यामुळे पुन्हा जोडण्यात आले. ज्या मिळकती अजूनही सील आहेत अशा मिळकतीचा जाहीर लिलाव करण्याकरिता मा. जिल्हाधिकारी सो. यांचेकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.

तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीतील सर्व मिळकतीचा सर्वे करून अनधिकृत नळजोडणी शोधून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. मालमत्ता कर व पाणीपट्टी कराची संपूर्ण थकबाकी भरल्याशिवाय तळेगाव दाभाडे नगरपरिषद मार्फत दिले जाणारे कुठलेही दाखले देण्यात येणार नसल्याने तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीतील सर्व मिळकतधारक नागरिकांनी लवकरात लवकर थकबाकी भरून पुढील कटू कारवाई टाळावी असे आवाहन मुख्याधिकारी श्री.एन.के. पाटील यांचे मार्फत करण्यात येत (Talegaon Dabhade) आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.