Baramati Loksabha Election : बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांना पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांची भेट

एमपीसी न्यूज – बारामती लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी (दि. 7) मतदान (Baramati Loksabha Election)होत आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील 20 मतदान केंद्र पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत आहेत. तिथे पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी मतदान केंद्रांना भेटी देऊन मतदान केंद्रांवरील सुरक्षेचा आढावा घेतला.

लोकसभा निवडणुकीसाठी देशात तिसऱ्या टप्प्यातील मतदान मंगळवारी (दि. 7) सुरु (Baramati Loksabha Election)आहे. तिसऱ्या टप्प्यात देशात 91 तर महाराष्ट्र राज्यातील धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, बारामती, हातकणंगले, कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, रायगड या 11 लोकसभा मतदार संघांमध्ये मतदान सुरु आहे. बारामती लोकसभा मतदार संघात दौंड, इंदापूर, बारामती, भोर, खडकवासला, पुरंदर हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात.

खडकवासला मतदारसंघातील 20 मतदान केंद्र पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत येतात. या केंद्रांमध्ये एकूण 93 बूथ आहेत. बारामती लोकसभेची निवडणूक राज्यात बहुचर्चित आहे. त्यामुळे या मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. इथे कोणतीही अनुचित घटना घडू नये, मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडता यावी यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.

TDR : कथित टिडीआर घोटाळ्याबाबत रस्त्यावरची व कायदेशीर लढाई सुरूच ठेवणार- संभाजी ब्रिगेड

मतदान सुरु असताना पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी हिंजवडी परिसरातील मतदान केंद्रांना भेटी दिल्या. मतदान केंद्रांवरील सुरक्षेचा आढावा त्यांनी घेतला. यावेळी त्यांच्यासोबत पोलीस उपायुक्त बापू बांगर आणि अधिकारी उपस्थित होते.

20 केंद्रांवर एक हजार पोलिसांचा फौजफाटा

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत असलेल्या 20 केंद्रांवर एक पोलीस उपायुक्त, तीन सहायक आयुक्त, 90 अधिकारी (निरीक्षक, सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक) 722 कर्मचारी, 81 होमगार्ड, पाच विशेष सशस्त्र पोलीस दल, केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाची एक तुकडी असा तब्बल हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.