Pimple Guruv : पिंपळे गुरव येथे गवताला आग, पार्क केलेल्या सहा गाड्या आगीत जळून खाक

एमपीसी न्यूज – पिंपळे गुरव येथील पवनानगर येथे शुक्रवारी (दि. 26 ) सायंकाळी चारच्या सुमारास मोकळ्या जागेत गवताला अचानक आग लागली. या आगीत रस्त्यालगत उभ्या केलेल्या सहा मोटारींना त्याची मोठी झळ बसली. अग्निशमन दलाच्या जवानांनी एका तासात आग आटोक्यात आणली.

Pimpri : अतिउच्चदाबाच्या 400 केव्ही उपकेंद्रात बिघाड; पिंपरी, तळेगाव, चाकण परिसरात दीड तास वीजपुरवठा खंडित

पवनानगर येथे रस्त्याच्या कडेला गवत असून, त्याला शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास अचानक आग लागली. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. त्यामुळे रस्त्यालगत उभ्या असलेल्या मोटारींनी पेट घेतला. या आगीत सहा मोटारींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आगीची माहिती मिळताच महापालिका पिंपरीतील मुख्य अग्निशमन केंद्र, रहाटणी उप अग्निशमन केंद्राच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन जवानांनी आगीवर पाण्याचा फवारा मारून एक तासात आगीवर नियंत्रण मिळवले.

ही कारवाई अग्निशमन दलाचे लिडिंग फायरमन किरण निकाळजे फायरमन कैलास वाघेरे, भूषण येवले, संतोष कदम, प्रमोद जाधव, सिद्धेश दरवेश, प्रतीक खांडगे, ओंकार शिंदे, शुभम क्षीरसागर, समीर पोटे, ऋषिकेश जगताप, ओंकार रसाळ, संकेत घोगरे यांनी (Pimple Guruv) केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.