Loksabha Election : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सापडलं पैशाचं घबाड

आयकर विभागाकडून कसून चौकशी सुरु

एमपीसी न्यूज : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी पवई परिसरात नाकाबंदी करत एका व्हॅनमधून तब्बल 4 कोटी आणि 70 लाखांची रोख पकडली असून निवडणूक कार्यालय आणि आयकर विभागात याची माहिती(Loksabha Election) दिली आहे.

याबाबतची सविस्तर माहिती अशी आहे की, दि.(6 मे) ला म्हणजे परवा रात्री पवई पोलीस स्टेशनच्या आवारात गार्डन बीट चौकीजवळ पवई पोलिसांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाकाबंदी लावण्यात आली होती. या नाकाबंदीमध्ये कॅश व्हॅन जात असताना पवई पोलिसांनी गाडीला थांबून चौकशी केली असता, पवई पोलिसांनी 4 कोटी 70 लाख रुपये कॅश व्हॅनमधून त्वरीत जप्त केले आहेत.

Nigdi : निगडी येथे 29 लाखांची रोकड जप्त

पवई पोलिसांनी आयकर विभाग आणि निवडणूक कार्यालयात याची सविस्तर माहिती दिल्यानंतर निवडणूक अधिकारी त्या कॅशच्या बारकोड स्कॅन केल्यानंतर बारकोड मिस मॅच  झाला. या संबंधी आयकर विभागाने गाडी आपल्या ताब्यात घेऊन ही रोकड कुठून आणली आणि एटीएम मशीनमध्ये भरण्यासाठी घेऊन जात होते की, लोकसभा निवडणुकीमध्ये या रोकडचा वापर केला जाणार होता का? या संदर्भात आयकर विभाग(Loksabha Election) पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.