Hinjawadi : भरधाव वेगात डंपर चालवत दुचाकीला धडक; दुचाकीस्वार ठार

एमपीसी न्यूज –  भरधाव वेगात डंपर चालवत एका दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. हा अपघात सोमवारी (दि.6) हिंजवडी फेज-2 येथे घडला(Hinjawadi) आहे.

 

कुणाल कौसिक डे (वय 24 रा.माण, मुळशी) असे मयत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात टाटा 1618 सी हायवा (एमएच-12 क्यूजी-1213)  वरील चालक महावीर जालिंदर समिंदर (वय 36 रा.देहुगाव) याच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.हिंजवडी पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई सागर घोगरे यांनी फिर्याद(Hinjawadi) दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “आरोपीने त्याच्या ताब्यातील हायवा डंपर हे बेदरकारपणे चालवून डे यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. यात दुचाकीस्वार कुणाल डे हे गंभीर जखमी झाले”. मात्र आरोपीने तेथे थांबून वैद्यकीय मदत न करता तेथून पसार झाला व डे यांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. यावरून हिंजवडी पोलीस ठाण्यात पिर्याद दिली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.