Lonvala :  पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर खाजगी बसला आग, सुदैवाने कोणीही जखमी नाही

एमपीसी न्यूज – मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर मावळ तालुक्यातील आढे (Lonvala) गावाजवळ (किमी 78) पुणे मार्गिकेवर एका खाजगी प्रवासी बसचा टायर फुटल्याने अचानक पेट घेऊन लागलेल्या आगीमध्ये जळून खाक झाली. या बस मध्ये 36 प्रवासी होते. प्रसंगवधान राखत सर्व प्रवासी व चालक हे बसमधून बाहेर आल्याने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आज शनिवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे.

Pimple Guruv : पिंपळे गुरव येथे गवताला आग, आगीत पार्क केलेल्या सहा गाड्या जळून खाक

मिळालेल्या माहितीनुसार बस पुण्याच्या दिशेने जात असताना टायर फुटला व त्यानंतर शॉर्ट सर्किट झाल्याने बसला आग लागली या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, डेल्टा फोर्स, वडगाव वाहतूक पोलीस यंत्रणा यांच्या संयुक्त प्रयत्नाने आग विझवण्यात आली आहे. एक्सप्रेस वे च्या वरून गावांना जोडणाऱ्या पुलाखालीच ही घटना घडल्याने पुलावर काही काळ धुराचा लोट (Lonvala)  उसळला होता.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.