Today’s Horoscope 08 May 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य
एमपीसी न्यूज – Today’s Horoscope 08 May 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य
आजचे पंचांग
आजचा दिवस – बुधवार.
दिनांक- 08.05.2024.
शुभाशुभ विचार- सामान्य दिवस.
आज विशेष- अमावास्या वर्ज्य.
राहू काळ- दुपारी 12.00 ते 01.30.
दिशा शूल – उत्तरेस असेल.
आजचे नक्षत्र – 13.34 पर्यंत भरणी नंतर कृत्तिका.
चंद्र राशी – मेष 19.07 पर्यंत नंतर वृषभ.
—————————–
मेष (शुभ रंग – केशरी)
आज तुमचे मनोबल उत्तम असेल. कार्यक्षेत्रात नवीन आव्हानांना यशस्वीपणे तोंड द्याल. आज वाणीत गोडवा ठेवाल तर अनेक किचकट कामे सोपी होऊ शकतील.
वृषभ (शुभरंग – मोरपंखी)
आज घाई गर्दीत घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता जास्त आहे. ज्यात काही कळत नाही त्यात उगीच डोकं घालू नका. आवक उत्तम असताना बचतीला प्राधान्य द्या.
मिथुन (शुभ रंग- पिस्ता)
कार्यक्षेत्रात दुपारनंतर अनुकूलता वाढेल. तुम्ही केलेल्या कष्टांचे चीज होईल तुमच्या मानसन्मानात वृद्धी होईल. एखादी गहाळ झालेली वस्तू आज दुपारनंतर सापडेल.
कर्क (शुभ रंग – क्रीम)
सर्व महत्त्वाची कामे आज दिवसाच्या पूर्वार्धात उरकून टाका. आज संध्याकाळी काही जुनी मित्रमंडळी भेटतील. मॉलमध्ये फेरफटका मारून अनावश्यक खर्च कराल.
सिंह (शुभ रंग- जांभळा)
कार्यक्षेत्रात काही मनासारख्या घटना तुमचा कार्य उत्साह वाढवतील. खिशात पैसाही खेळता असेल. प्रतिष्ठित लोकांमधील उठबस व्यवसाय वृद्धीच्या कामी येईल.
कन्या (शुभ रंग- निळा)
कार्यक्षेत्रात काही मनाविरुद्ध घटना घडतील. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांच्या दडपणाखाली काम करावे लागेल. गृहिणींना घरातील थोरा-मोठ्यांची मने जपावी लागतील.
तूळ (शुभ रंग – राखाडी)
कोणतीच गोष्ट आज सहज साध्य नसली तरीही तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना यश नक्कीच मिळेल. तरुण वर्गाने हौस मौज करताना कायद्याचे बंधन पाळावे.
वृश्चिक (शुभ रंग – भगवा)
नवीन व्यवसायात मर्यादा ओळखून आर्थिक उलाढाली केलेल्या बऱ्या. मोठे आर्थिक व्यवहार उद्यावरच ढकला. कुसंगतीमुळे प्रतिष्ठा धोक्यात येऊ शकते सतर्क रहा.
धनु (शुभ रंग – आकाशी)
कार्यक्षेत्रातील तुमचे महत्त्व वाढेल. इतरांना न झोपणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकाराल व त्या पूर्णही कराल. व्यापाऱ्यांची आवक मुबलक राहील. आज जोडीदाराला दिलेले शब्द पाळावे लागतील.
मकर (शुभ रग- चंदेरी)
ध्येयप्राप्तीसाठी कामाचे तास वाढवावे लागतील. काही येणी असतील तर मागायला लाजू नका. रुग्णांनी पथ्य पाणी पाळावे. गृहिणीसाठी आज अतिव्यस्त दिवस.
कुंभ (शुभ रंग- पांढरा)
कलाकारांच्या उमेदवारीला यश येऊन त्यांना उत्तम संधी चालून येतील. नोकरदारांना वरिष्ठांच्या लहरी सांभाळाव्या लागतील. रुग्णांच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा दिसून येईल.
मीन ( शुभ रंग- सोनेरी)
आज आनंदी व उत्साही दिवस असून सगळी कामे सुरळीत पार पडतील. घर सजावटीसाठी काही पैसा खर्च कराल. कलाक्रीडा क्षेत्रातील मंडळींना प्रयत्न वाढवावे लागतील.
शुभम भवतु
श्री जयंत कुळकर्णी.
ज्योतिष व वास्तु विषयक सल्लागार.
फोन – 9689165424