Talegaon Dabhade : अक्षय तृतीयानिमित्त ग्रामदैवत डोळसनाथ महाराज मंदिरात रुद्र याग, चंदन उटी व भंडारा

एमपीसी न्यूज : अक्षय तृतीयानिमित्त तळेगावचे ग्रामदैवत डोळसनाथ महाराज मंदिरात (Talegaon Dabhade ) रुद्रयाग, चंदन उटी व भंडारा अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.या कार्यक्रमासाठी भाविकांनी अन्न, वस्त्र, जलकुंभ,पंखे, पादत्राणे, छत्री, गूळ, तीळ, जवस, गहू, तांदूळ, मध, तूप, हिरण्य व दक्षिणा अशा वेगवेगळ्या स्वरुपात दान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हिंदू धर्मात अक्षय तृतीयाचे विशेष महत्व आहे. वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला म्हणजेच अक्षय तृतीयेला देवतांचे व पितरांचे पूजन केले जाते. यानिमित्त ग्रामदैवत श्री डोळसनाथ मंदिरात लोकसहभागातून शुक्रवारी (दि.१०) रुद्र याग, चंदन उटी व भंडारा असे कार्यक्रम घेतले जाणार आहेत.

Today’s Horoscope 08 May 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

शुक्रवारी सकाळी सात वाजता श्रींची महापूजा व अभिषेक, सकाळी नऊ वाजता -श्रींची चंदन उटी, सकाळी अकरा वाजता रुद्रयाग (होमहवन), दुपारी चार ते सहा या वेळेत श्री डोळसनाथ महिला भजनी मंडळाचे हरिपाठ व भजन, सायंकाळी सहा वाजता कालभैरवाष्टक, जप, नामस्मरण, सव्वा सहा वाजता भाजे येथील तुषार महाराज दळवी यांचे प्रवचन, सात वाजता दीपमाळ प्रज्वलन, सायंकाळी साडेसात वाजता आरती आणि आठ वाजता महाप्रसाद होणार आहे. लोक सहभागातून होणाऱ्या या कार्यक्रमात जास्तीत जास्त भाविकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले (Talegaon Dabhade ) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.