Dharashiv Loksabha Election : भूम तालुक्यातील पाटसांगवी येथे मतदान केंद्राजवळ एकाची हत्या

एमपीसी न्यूज – धाराशिव लोकसभा मतदारसंघात भूम तालुक्यात (Dharashiv Loksabha Election)पाटसांगवी येथे मतदान केंद्राजवळ एकाची चाकूने वार करत हत्या करण्यात आली. राजकीय वादाचे रुपांतर हत्येत झाल्याने भूम तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. मतदार आणण्यावरून हा वाद विकोपाला गेल्याचे म्हटले जात आहे.

समाधान पाटील असे मृत तरुणाचे नाव आहे. गौरव नाईकनवरे या तरुणाने(Dharashiv Loksabha Election) ही हत्या केल्याचे म्हटले जात आहे. सध्या तो पळून गेला आहे.

मंगळवारी (दि. 7) राज्यातील धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, बारामती, हातकणंगले, कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, रायगड या 11 लोकसभा मतदार संघांमध्ये मतदान सुरु आहे. पहिल्या दोन टप्प्यातील मतदान शांततेत पार पडले. मात्र तिसऱ्या टप्प्यात या निवडणुकीला गालबोट लागले आहे. धाराशिव लोकसभा मतदारसंघात मतदान केंद्राजवळ एका तरुणाची चाकूने वार करत हत्या करण्यात आली आहे.

Kolhapur Loksabha Election : मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

धाराशिव लोकसभा मतदार संघातील भूम तालुक्यातील पाटसांगवी येथे दोन गटात मंगळवारी राडा झाला. मतदार आणण्यावरून हा वाद झाल्याचे म्हटले जात आहे. त्यातून दोन गट आपसात भिडले. यामध्ये एकाची हत्या झाली असून तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी तिघांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मागील काही दिवसांपासून दोन गटातील हा वाद धुमसत होता. त्याला मंगळवारी तत्कालीन कारण मिळाले.

समाधान पाटील याचा मृतदेह तालुका रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. तिथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर हे भेट देणार असल्याची माहिती आहे. राजकीय वादातून ही हत्या झाल्याने हे वातावरण अधिक चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.