Loksabha Election : मतदानाच्या दिवशीच ‘शेजारील जिल्ह्यातील मतदानावर प्रभाव पाडण्यासाठी पंतप्रधानांच्या जाहीर सभांचा’ घाट – गोपाळ तिवारी

महाराष्ट्रात जाणूनबुजून प्रथमच 5 टप्प्यात मतदान

एमपीसी न्यूज – “आजपर्यंत एवढ्या जास्त टप्प्यात कधीही न झालेले मतदानाचे टप्पे महाराष्ट्रात 48 जागांसाठी 5 टप्प्यात मतदान” या निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे गौडबंगाल, “पंतप्रधानांच्या प्रचार सभांच्या नियोजनावरून” स्पष्ट होत असल्याचा आरोप काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी(Loksabha Election) केला.

 

‘महाराष्ट्रातील विरोधक’ संपुष्टात आणण्याच्या लोकशाही विरोधी कुहेतूने, कट-कारस्थानाने केलेल्या सरकार पाडापाडीच्या राजकारणामुळे महाराष्ट्र राज्यातील मोदी सरकारच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. त्याची प्रचिती वारंवार येत असून, वणवण फिरत भाषणजीवी मोदींना महाराष्ट्रात  तेरावी जाहीर सभा घेण्याची वेळ येणे, हे पराभवाचे द्योतक(Loksabha Election) आहे.

 

पुणे जिल्ह्यातील (बारामती) मतदारसंघात  निवडणुकीचे मतदान होत असतांनाच,  शेजारील नगर जिल्ह्यात मात्र पंतप्रधान मोदींची जाहीर सभा होणे हे मतदानावर व मतदारांवर प्रभाव पाडणार कृत्य होत नाही काय  हे निवडणूक आयोगास न समजणे एवढे निवडणूक आयोग अनभिक्षीक्त किंवा दुधखुळे आहे काय असा संतप्त सवाल देखील काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केला.

 

त्यांनी पुढे सांगितले की, संविधानिक लोकशाही मार्गाने निवडणुका निकोप वातावरणात घेणे हे स्वायत्त असलेल्या निवडणूक आयोगावर बंधनकारक आहे तसेच ‘लोकशाहीची बूज राखणे’ हे देखील लोकशाहीचा पहिला स्तंभ असलेल्या व जनतेच्या कररुपी पैशातून उच्चस्तरीय पगार व सोयी-सुविधा घेणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर तेवढेच अवलंबून आहे.

 

मात्र,अनेक प्रशासकीय अधिकारी वर्ग सत्ताधीशांच्या कुटील कारस्थानांना बळी पडून आणि त्यांच्या इशाऱ्यावर नाचत असल्याचे व संविधानिक नीती,नियम पायदळी तुडवत असल्याचे दिसून येत आहे.काँग्रेस सत्तेत आल्यावर अशा संविधानिक नियम डावलून काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची कायदेशीर नोंद घेईल, असा सज्जड इशारा देखील गोपाळ तिवारी यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात दिला.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.