Talegaon Dabhade: कला ही कालसापेक्ष असते. कोणतीही कलाकृती घडवून होत नाही, ती घडत जाते- डॉ. जब्बार पटेल

एमपीसी न्यूज – कला ही काळाशी निगडीत असते. कोणतीही कलाकृती घडवून होत नाही, ती घडत जाते. कलाकारानी पुनःपुन्हा स्वतःला आणि स्वतःच्या पारितोषिकांना तपासणं महत्त्वाचं. सतत सगळं मिळणं म्हणजे आपण स्वतःला तपासायची गरज आहे हे लक्षात घेणं महत्त्वाचं.” असे मत सुप्रसिद्ध दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल(Talegaon Dabhade) यांनी व्यक्त केले. 

कलापिनीच्या 47  व्या वर्धापन सोहळ्यानिमित्त सुप्रसिद्ध दिग्दर्शक व 100 व्या  अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष  डॉ. जब्बार पटेल उपस्थित होते.त्याच्या हस्ते कलापिनीच्या वर्धापन दिनानिमित्त कलापिनी पुरस्कारांच्या सोहळ्याचे वितरण झाले. यावेळी कलापिनी कलामंडळ प्रमुख चेतन शहा, कार्याध्यक्षा अंजली सहस्त्रबुद्धे यांना कलापिनीतील विशेष योगदानाबद्दल गौरविण्यात आले.

वर्धापन दिन सोहळा कलापिनी सांस्कृतिक केंद्रातील डॉ. शं. वा. परांजपे नाट्यसंकुलात संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर डॉ पटेल, डॉ. अनंत परांजपे, विनायक अभ्यंकर, हेमंत झेंडे, अशोक बकरे, अंजली सहस्त्रबुद्धे, चेतन शहा आदी मान्यवर उपस्थित होते. मुक्ता, एक होता विदुषक, सिंहासन, जैत रे जैत असे एकाहून एक गाजलेले चित्रपट, तुझे आहे तुजपाशी, वेड्याचे घर उन्हात, घाशीराम कोतवाल यांसारख्या नाटकातून अभिनेते म्हणून रसिकप्रिय असे जब्बार पटेल यांना प्रकट मुलाखतीमधून ऐकण्याची संधी रसिकांना मिळाली.

आकाशवाणीतील प्रसिद्ध कार्यक्रम अधिकारी राजेंद्र पाटणकर यांनी डॉ पटेल यांची मुलाखत घेतली. कार्यक्रमास प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.

डॉ. जब्बार पुढे म्हणाले, “महाराष्ट्रात कुठेही नसेल अशी नाट्यसंस्था तळेगावात आहे ,जिथं अनेक गोष्टी एकाच वेळी होतात आणि प्रत्येक वयोगटातील कलाकारांसाठी उपक्रम राबवले जातात जे अन्यत्र कुठेही होत नाही. छोट्या गावांमध्ये टॅलेण्ट भरपूर आहे. कलापिनीसारखं मोकळं आणि स्वतंत्र विचारांना  स्वातंत्र्य देणारं व्यासपीठ तुमच्या भाग्यानी तुम्हाला मिळालंय. तेंव्हा युवकांनो नवीन नवीन विषय घेवून नाटकं लिहा आणि प्रायोगिक नाटकांद्वारे  रंगमंचावर(Talegaon Dabhade) आणा.”

कार्यक्रमाची सुरुवात दिनेश कुलकर्णी लिखित आणि संपदा थिटे यांनी संगीत दिलेल्या ‘कलापिनी’ गीताने  झाली. डॉ. प्राची पांडे, प्राची गुप्ते, चांदणी पांडे, संपदा गुरव यांनी गीत सादर केले. ‘अशी पाखरे येती’  या नाटकातील प्रवेश विराज सवाई यांनी सादर केला.

वर्धापन दिनाच्या निमित्ताने कलापिनीसाठी योगदान देणाऱ्या आणि सेवाभावी वृत्तीने कार्य करणाऱ्या गुणवंताचा गौरव केला जातो. कार्याध्यक्षा अंजली सहस्त्रबुध्दे आणि कला मंडळ प्रमुख चेतन शहा आणि त्यांची पत्नी स्मिता शहा यांचा प्रमुख पाहुणे जब्बार पटेल यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

कलापिनीच्या गुणवंत कलाकारांना डॉ.पटेल यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.

पुरस्कार पुढीलप्रमाणे – लक्षवेधी बालकलाकार पुरस्कार अवनी परांजपे हिला मिळाला. महिला मंच प्रोत्साहन पुरस्कार राखी भालेराव ,उत्कृष्ठ महिला  कलाकार  ज्योती गोखले, महिला मंच सखी  पुरस्कार ऋचा पोंक्षे, कलापिनी  रंगकर्मी पुरस्कार – विजय कुलकर्णी,  प्रतिक  मेहता, धडपड पुरस्कार – सुमेध सोनवणे , पडद्या मागचा कलाकार – प्रसाद वायकर, हरहुन्नरी कलाकार – अभिलाष भवार , चतुरस्त्र कलाकार – संदीप मनवरे ,कला गौरव पुरस्कार – विराज सवाई ,चैतन्य जोशी ,सुबोध भावे पुरस्कृत कै.विजय तेंडुलकर स्मृती लेखन पुरस्कार – श्री.मिलिंद खरात सुबोध भावे पुरस्कृत कै. सतीश तारे स्मृती पुरस्कार आणि कै. हेमंत तुंगार स्मृती युवा गौरव पुरस्कार – सायली रौधळ.

विनायक अभ्यंकर स्वागत केले. डॉ परांजपे यांनी प्रास्ताविक केले. डॉ विनया केसकर यांनी सूत्रसंचालन केले. लीना परगी आणि हेमंत झेंडे यांनी मानपत्र वाचन केले. सायली रौधळ यांनी त्यांच्या मनोगतात सांगितले, “कलापिनी मधील कामातून प्रेरणा घेऊनच व्यावसायिक रंगभूमीवर काम करते आहे. इथल्या वेगवेगळ्या उपक्रमातून आत्मविश्वास मिळाला आहे. “

वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन लावले होते. चैतन्य जोशी, मीनाक्षी झेंडे, हेमंत झेंडे, दुर्गा देसाई आदींनी प्रदर्शनाची जबाबदारी उत्तम रित्या पार पाडली. प्रतिक मेहता, स्वच्छंद यांनी प्रकाशयोजना केली. सुमेर नंदेश्वर यांनी ध्वनीसंयोजन केले. विराज सवाई यांनी रंगमंच व्यवस्था सांभाळली. विनायक भालेराव, केतकी लिमये, रुपाली पाटणकर, राखी भालेराव, दीपाली जोशी, सुप्रिया खानोलकर, मधुवंती रानडे, ज्योती ढमाले, अनघा बुरसे, श्रीपाद बुरसे, रामचंद्र रानडे, रश्मी पांढरे, रवींद्र पांढरे , कलापिनी कुमारभवनची मुले यांनी संयोजनात मदत केली.

Talegaon :कलापिनी कलामंडळ 2024-25 चा शुभारंभ संकर्षण कऱ्हाडेच्या ‘नियम व अटी लागू’ या नाटकाने

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.