Talegaon :कलापिनी कलामंडळ 2024-25 चा शुभारंभ संकर्षण कऱ्हाडेच्या ‘नियम व अटी लागू’ या नाटकाने

एमपीसी न्यूज:  कलापिनी कलामंडळ 2024-25 चा शुभारंभ संकर्षण कऱ्हाडेच्या ‘नियम व अटी लागू’ या नाटकाने  शं.वा.परांजपे नाट्यगृहात आज(दि.25) रोजी सादर झाला.  ” नियम व अटी लागू ” नाटक हे संकर्षण कऱ्हाडे लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित असून या नाटकाचा शो हाऊसफुल्ल गर्दीत(Talegaon) झाल्याचे समजते.

हे नाटक जरी मनोरंजनात्मक,विनोदी असलं तरी आजच्या तरुणाईला महत्वाचा संदेश देणारं होतं. तसेच सर्वांना भरपूर हसवणारं, आनंद देणारं आणि नवीन पिढीला छान संदेश देणारं असंच होतं.नवीन वर्षाची सुरवात एवढ्या छान नाटकाने झाल्यामुळे रसिकवर्ग प्रेक्षक खूप खूश होते. मध्यंतरात सर्व कलाकारांचे कलापिनीच्या कार्यकारिणीतील सभासदांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.कलापिनी कलामंडळचे विश्वस्त डॉ.अनंत परांजपे,अध्यक्ष विनायक अभ्यंकर,कार्याध्यक्ष अंजली सहस्रबुद्धे,उपाध्यक्ष अशोक बकरे,सचिव हेमंत झेंडे,सहसचिव विनायक भालेराव,कोष्याध्यक्ष श्रीशैल गद्रे,आणि कलामंडळ प्रमुख चेतन शहा,संजय मालकर हे उपस्थित(Talegaon) होते.

संकर्षण कऱ्हाडे यांनी तळेगावचे रसिक प्रेक्षक समजून नाटक पाहणारे आहेत तर बाल प्रेक्षक हेही तितक्याच उत्साहाने नाटक पाहत होते म्हणून मला बाल प्रेक्षकांचे कौतुक वाटत आहे. त्यांनी आपल्या मनोगतात  कलाकार आणि रसिक प्रेक्षक घडविणाऱ्या कलापिनीचे मनापासून कौतुक केले व कलापिनीची प्रगती बघायला मला दरवर्षी यायला आवडेल असे सांगितले.

Dehugaon : जगद्गुरु श्री संत तुकोबांचा पालखी सोहळा 28 जूनला

यावर्षाची सुरूवात दमदार झाली असून वर्षभर असेच विविध आणि दर्जेदार कार्यक्रम सादर होणार आहेत त्यामुळे रसिकांनी कलामंडळ सदस्य होऊन आनंदात सहभागी व्हावे असे आवाहन कलापिनी विश्वस्त डॉ.अनंत परांजपे यांनी केले .संकर्षणचा आणि अमृता देशमुख आणि त्यांना साथ देणारा प्रसाद बर्वे  सर्वांच्याच भूमिका उत्तम असून त्यांच्या संवादफेकीला आणि विनोदाच्या टायमिंगला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.