Loksabha Election : ‘वारसा हक्क संपत्तीकर लावण्याचे मनसुबे 2019 साली भाजपचेच’ – गोपाळ तिवारी 

‘कट-कारस्थानांचा डीएनए’ हा भाजप’चा, काँग्रेसचा नव्हे !

एमपीसी न्यूज – इंडीयन ओव्हरसीज काँग्रेसचे अघ्यक्ष सॅम पित्रोदा यांनी शिकागो येथील एका कार्यक्रमात अमेरिकेतील वारसाहक्क संपत्ती बाबत काय कायदा आहे याची माहिती काल(दि.24) रोजी दिली पण ते अमेरिकेचे नागरिक असून त्याचा अर्थोअर्थी भारताशी काहीही संबंध नाही.अमेरिकेत एखादी श्रीमंत व्यक्ती मृत पावल्यास त्याची सुमारे 55% संपत्ती ‘वारसा कराच्या’ रुपाने  सरकारजमा होते व ती सरकारच्या कोषागारातून समाज कल्याणाकरीता खर्च होते, एवढेच सॅम पित्रोडा म्हणाले होते. यावर काँग्रेस नेते श्री जयराम रमेश यांनी सॅम पित्रोडा यांचे वक्तव्याशी काँग्रेसचा कोणताही संबंध नसल्याचे देखील सांगितले आहे.तरीदेखील ‘भाजपचे नेते ते प्रवक्ते’ नेतृत्वाकडून आलेला खोटारडेपणाचा प्रपोगंडा करण्याचा प्रयत्न करत आहेत असे काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाल तिवारी यांनी आज(दि.25) म्हटले (Loksabha Election) आहे.

 

अमेरिकन वास्तव्य असलेल्या पित्रोदांच्या विघानाचा कपोलकल्पित आघार घेत व अकलेचे तारे तोडत काँग्रेस भारतात वारसा हक्क संपत्ती कर लावून देशातील नागरीकांची संपत्ती लुटण्याचे कट कारस्थान रचत असल्याचा बालीश व हास्यास्पद आरोप करत असल्याचे प्रतिपादन काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केले.

Delhi : ‘इंडियन ओवरसीज काँग्रेस’चे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांच्या ‘त्या’ विधानावर काँग्रेसने हात झटकले

ते पुढे म्हणाले की,मुळात भाजप नेते व प्रवक्त्यांनी किमान हे लक्षांत ठेवावयास हवे होते की, “काँग्रेसचा न्याय पत्र जाहीरनामा” हा सत्ताधारी पक्षाच्याही अगोदर जाहीर झाला आहे.त्यामध्ये “वारसाहक्क संपत्ती कराचा” कुठेही ऊल्लेख नाही.किमान आरोप करण्यापूर्वी हे तरी तपासले पाहिजे होते. तसेच जर ‘वारसा हक्क संपत्तीकराच्या’ रुपाने देशातील नागरीकांची संपत्ती लुटण्याचे कट कारस्थान” जर कोणी केले असेल, तर दस्तूरखुद्द मोदी – शहांच्या विकसीत भाजपने 2019 मध्ये तत्कालीन अर्थमंत्री जयवंत सिन्हा यांनी वारसा हक्क संपत्ती कर भारतात लागू करण्याचे विधान केले होते. किमान हे तरी भाजपच्या भाषणजीवी नेतृत्वाने लक्षात घ्यायला हवे होते. त्यामुळेच ‘कट कारस्थान करण्याचा डीएनए हा भाजपचाच’ असल्याचे ध्यानात येईल अशी पुष्टी काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी(Loksabha Election) यांनी जोडली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.