Delhi : ‘इंडियन ओवरसीज काँग्रेस’चे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांच्या ‘त्या’ विधानावर काँग्रेसने हात झटकले

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सॅम पित्रोदा यांच्या विधानामुळे काँग्रेस अडचणीत

एमपीसी न्यूज : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून काँग्रेसचे नेते आणि इंडियन ओवरसीज काँग्रेस’चे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी केलेल्या विधानावर प्रतिक्रिया येऊ लागताच काँग्रेसचे नेते जयराम रमेश आणि पवन खेडा (Delhi) यांनी पलटवार केला आहे.

‘इंडियन ओवरसीज काँग्रेस’चे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी अमेरिकेत शिकागोमधून बोलताना म्हटले की,अमेरिकेत वारसा कर असतो. जर एखादयाकडे 50 मिलियन डॉलर्स संपत्ती असेल तर त्या व्यक्तीच्या मृत्यू पश्चात त्याच्या संपत्तीतील 45 टक्के वाटा मृतांच्या वारसाला मिळतो तर 55 टक्के वाटा  सरकारजमा होतो. अमेरिकेतील हा कायदा खूप चांगला असून तुमची अर्धी संपत्ती राष्ट्रासाठी सोडावी असा उद्देश या मागे असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. अमेरिकेमध्ये जसा वारसा कायदा आहे तसा भारतात नाही.जर एखाद्या व्यक्तीकडे 100 मिलियन डॉलर्स असतील तर तो व्यक्ती मृत पावल्यास त्याच्या वारसांना भारतात पूर्ण संपत्ती मिळते मात्र जनतेला यातून काहीच मिळत नाही.त्यामुळे अशा विषयांवर चर्चा झाली पाहिजे आणि याचा अंतिम परिणाम काय असेल हे मात्र मला माहीत नाही असे ते म्हणाले.

सॅम पित्रोदा यांच्या या विधानामुळे भाजपला विनासायास आयते कोलीत (Delhi) मिळाले आहे. भाजपचे नेते अमित मालविया यांनी टीका करताना म्हटलं की, काँग्रेसचे धोरण देशाला उद्ध्वस्त करणारे असून सॅम पित्रोदा संपत्तीच्या पुनर्वाटपासाठी ५० टक्के वारसा कर कायदा भारतात लागू करावा अशीच त्यांची मानसिकता दिसून येत आहे. तसेच त्यांच्या विधानाचा असा अर्थ आहे की, आपण आपलं सर्व कष्ट आणि उद्योग यातून जे काही उभारू त्यातलं ५० टक्के हिसकावून घेतलं जाईल. आधीच दिल्या जाणाऱ्या कराशिवाय ५० टक्के कर वारसा कर म्हणून घेतला जाईल. या लोकसभा निवडणुकीत जर काँग्रेस जिंकले तर ते सुद्धा वाढेल.

 

भाजपाकडून काँग्रेसचे नेते सॅम पित्रोदा यांच्या विधानावर प्रतिक्रिया येऊ लागल्यावर काँग्रेसचे नेते जयराम रमेश आणि पवन खेडा यांनी मात्र पलटवार केला आहे. पित्रोदा यांनी केलेले विधान हे काँग्रेसच्या जाहीरनाम्यात आहे का? पित्रोदा यांचे धोरण म्हणजे काँग्रेसचे धोरण आहे का?

सॅम पित्रोदा यांना त्यांचे मत मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे पण त्यांच्या विधानाशी काँग्रेस सहमत असेल असं नाही.लोकशाहीत प्रत्येकाला विचार मांडण्याचा अधिकार आहे. भाजप सॅम पित्रोदा यांच्या विधानाचा वापर करून लोकांची दिशाभूल करत आहे.

Pune: संपत्ती लुबाडण्याचा काँग्रेसचा कट, जनताच यशस्वी होऊ देणार नाही;भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा रोखठोक इशारा

‘इंडियन ओवरसीज काँग्रेस’चे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी केलेल्या विधानामुळे काँग्रेस जरी पाठराखण करत नसेल तरी ऐन लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या मतदानावर परिणाम होऊ शकतो का हे मात्र आता पाहावे लागेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.