Hinjawadi : गुंतवणुकीच्या बहाण्याने पाच लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल असे आमिष दाखवून एका व्यक्तीची(Hinjawadi) चार लाख 90 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 8 मे 2023 ते 13 मे 2023 या कालावधीत हिंजवडी येथे घडली.
राहुल राजवरुण, गौरव शर्मा, तिक शर्मा, कविता राऊत, दीपिका सिंग अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी मृत्युंजय सुर्यकांत मांडवकर (वय 41, रा. हिंजवडी) यांनी मंगळवारी (दि. 23) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद (Hinjawadi) दिली आहे.

Talwade: शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यास सांगत 37 लाखांची फसवणूक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून त्यांना शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले. शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल,असे आमिष दाखवण्यात आले. त्यातून त्यांच्याकडून चार लाख 90 हजार रुपये घेतले. त्यानंतर त्यांना परतावा अथवा मूळ रक्कम परत न देता त्यांची फसवणूक केली. हिंजवडी पोलीस पुढील  तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.