Medankarwadi : गांजा बाळगल्याप्रकरणी महिलेस अटक

एमपीसी न्यूज – विक्रीसाठी अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी महिलेस (Medankarwadi)अटक केली. तिच्याकडून एक लाख 16 हजार रुपये किमतीचा 2 हजार 320 ग्रॅम गांजा जप्त केला. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने चाकण येथील मेदनकरवाडीत शुक्रवारी (दि. 3) ही कारवाई केली. 
नंदा रंगनाथ साळुंके (वय.50 रा. मेदनकरवाडी, चाकण, ता. खेड) असे अटक केलेल्या (Medankarwadi)महिलेने नाव आहे. तिच्यासह भाऊ मेदगुले (रा. मेदगुलेवाडी, ता. शिरूर) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

 

Chinchwad :शेअर्सवर 165  टक्के नफा दाखवून 11 लाखांचा गंडा

 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदा साळुंके हिने विक्रीसाठी गांजा बाळगल्याची माहिती मिळाली. त्यानुसार अमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई केली. यात नंदा हिच्याकडून 1 लाख 16 हजार रुपये किमतीचा 2हजार 320 ग्रॅम गांजा जप्त केला. नंदा हिने भाऊ मेदगुले याच्याकडून हा गांजा आणल्याचे तपासात समोर आले. त्यामुळे भाऊ मेदगुले याच्या विरोधात देखील गुन्हा दाखल केला.

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.