Chinchwad :शेअर्सवर 165  टक्के नफा दाखवून 11 लाखांचा गंडा

एमपीसी न्यूज – शेअर्स व आयपीओमध्ये गुंतवणुकीवर जास्तीच्या परताव्याचे (Chinchwad)आमिष दाखवले. त्यानंतर महिलेची 11 लाख 10 हजारांची फसवणूक केली. चिंचवड एमआयडीसीतील थरमॅक्स चौकात 5 जानेवारी ते 13 मार्च 2024 या कालावधीत हा प्रकार घडला. 
मनीष कुमार, अंकिता गुप्ता, राहुल शर्मा या संशयितांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा (Chinchwad)दाखल केला. फसवणूक झालेल्या महिलेने याप्रकरणी शुक्रवारी (दि. 3) निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

Moshi: दोन महिलांकडून तरुणाला मारहाण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयितांनी फिर्यादी महिलेला एका ॲप्लिकेशनव्दारे शेअर्स आणि आयपीओमध्ये गुंतवूण करण्यास सांगितले. त्या माध्यमातून जास्त परताव्याचे आमिष दाखवले. महिलेने गुंतवलेल्या रकमेवर 165 टक्के नफा दाखवला. त्यामुळे गुंतवलेली रक्कम आणि नफा काढण्याचा प्रयत्न केला असता महिलेला सक्तीने आयपीओ खरेदी करा, असे सांगितले.
त्यांनी आयपीओ खरेदी न केल्याने संशयितांनी ॲप्लिकेशनचा ॲक्सेस काढून घेतला. तसेच ॲप्लिकेशनमध्ये असलेली फिर्यादी महिलेची गुंतवणूक केलेली 11 लाख 10 हजार रुपये परत न करता त्यांची फसवणूक केली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक शत्रुघ्न माळी तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.