Kalewadi: विनापरवाना गॅस विक्री प्रकरणी दोघांवर गुन्हा; एकास अटक 

एमपीसी न्यूज – शासनाची परवानगी न घेता गॅस विक्री केल्या प्रकरणी पोलिसांनी (Kalewadi)दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 22) सायंक पावणे नऊ वाजताच्या सुमारास काळेवाडी येथे करण्यात आली. 
विजय बालाजी भोसले (रा. थेरगाव), शंकर नखाते (रा. रहाटणी) अशी गुन्हा दाखल (Kalewadi)झालेल्यांची नावे आहेत. विजय भोसले याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार भगवंता मुठे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Talwade: शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यास सांगत 37 लाखांची फसवणूक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विजय याने धोकादायकपाने घरगुती वापराच्या मोठ्या सिलेंडर मधून लहान सिलेंडर मध्ये गॅस चोरून काढला. त्याच्याकडे गॅस विक्री अथवा रिफिलिंग बाबत कोणताही परवाना नसताना त्याने हे काम करून ग्राहकांची व शासनाची फसवणूक केली. आरोपी शंकर नखाते याने त्याची जागा बेकायदेशीर गॅस रिफिलिंगसाठी उपलब्ध करून दिली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.