Alandi : वरूथिनी एकादशी निमित्त माऊली मंदिरात हजारो भाविकांची गर्दी

 एमपीसी न्यूज – आज दि.4 रोजी  वरूथिनी एकादशी निमित्त आळंदी येथील संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात माऊलींच्या  (Alandi) संजीवन समाधी दर्शनासाठी हजारो भाविकांनी  गर्दी केली होती.एकादशी निमित्त मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती.

 

Nigdi : कायद्याचा धाक असेल तरच रामराज्य येईल – ॲड. अश्विनीकुमार उपाध्याय

तसेच यावेळी श्री सिद्धेश्वराचे हजारो भाविकांनी दर्शन घेतले. माऊलींच्या मंदिरा मध्ये   ज्ञानोबा तुकारामाच्या जयघोषात, हरिनामाच्या गजरात,टाळ मृदंगाच्या वाद्यात दिंडी प्रवेश करत प्रदिक्षणा पूर्ण करताना दिसून येत होती.माऊली मंदिरात भाविकांसाठी देवस्थान तर्फे ठीक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुविधा करण्यात आली होती.

मंदिरात भाविकांना एकादशी निमित्त उपवासाच्या पदार्थाचे (खिचडी) / फळाचे (केळी )वाटप करण्यात येत होते.इंद्रायणी घाटावर सुद्धा भाविकांची गर्दी दिसून येत होती. इंद्रायणी नदी मातेचे पूजन काही भाविक करताना दिसून येत होते. हार, फुले ,प्रसाद व वारकरी साहित्य, वस्तूंच्या दुकानांमध्ये नागरिकांची गर्दी दिसून येत  (Alandi)  होती.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.