RTE : ‘आरटीई’चा अर्ज भरण्यास विशेष शिक्षक करणार मदत

एमपीसी न्यूज – शिक्षण हक्क कायद्यांतर्गत आरटीई राखीव असलेल्या 25 टक्के जागांसाठीची (RTE) प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. केंद्रांवर अर्ज भरण्यासाठी पालकांना मदत करण्यासाठी शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. त्याबाबतचे आदेश प्रशासन अधिकारी संगीता घोडेकर-बांगर यांनी काढले आहेत.

 Alandi : वरूथिनी एकादशी निमित्त माऊली मंदिरात हजारो भाविकांची गर्दी

शहरामध्ये आरटीईअंतर्गत 322 शाळांची नोंदणी झाली आहे. त्या शाळांमध्ये 8 हजार 50 जागांवर आरटीईतून प्रवेश दिले जाणार आहेत. त्यासाठी ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात झाली. अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. अर्ज भरताना अनेक पालकांना अडचणी येतात. तसेच अर्ज कसा भरायचा याबाबत माहिती नसते. 11 केंद्रांवर प्रत्येकी शिक्षकांची नियुक्ती केली आहे.

पालकांच्या शंकांचे निरसनही करणार

मोरवाडी येथील एसएनबीपी शाळेत राजेंद्र पोळके, तृप्ती धुमाळ, चहोलीच्या किड्स पॅराडाइज स्कूलमध्ये सुनंदा भोसले, बाळासाहेब जाधव, कासारवाडीतील इन्फन्ट जिजस स्कूलमध्ये नीता खाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रहाटणीच्या डेलमॉट शाळेत संतोष जाधव, वाकडच्या एस. पी. स्कूलमध्ये प्रतिभा नेवकर, पिंपळे गुरव येथील किलबिल शाळेत गजेंद्र थोरात आणि काळेवाडी येथील बी. टी. मेमोरियल शाळेत अमृत मसुरे, आकुर्डी येथील फकीरभाई पानसरे उर्दू शाळेत शैला भुजबळ, सचिन अवचिते यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

तसेच कल्पना इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये राजेंद्र मोहिते, सोनम साळुंके, जी. एस. के. इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये भारती माळी, संदीप भुजबळ, सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विक्रम मोरे, सुजाता गायकवाड यांची नियुक्ती केली आहे.  हे शिक्षक पालकांना अर्ज भरण्यासाठी मदत करतील. तसेच पालकांच्या काही शंका असतील तर त्यांना त्याबाबत मार्गदर्शन करतील असे आदेश प्रशासन अधिकारी संगीता घोडेकर-बांगर यांनी दिले (RTE) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.