Pune : देशास आर्थिकदृष्टया खच्चीकरण व परावलंबी करणाऱ्यांनीच ‘आर्थिक स्वावलंबनाची’ भाषा बोलणे, ही देशाची कुचेष्टाच : गोपाळ तिवारी

एमपीसी न्यूज – देशाची सर्वाधिक संपत्ती खाजगी  उद्योजक मित्रांच्या घशात घालणारेच देश आर्थिकदृष्ट्या स्वावलंबनाची भाषा करतात हे केवळ हास्यास्पदच नव्हे तर कोडगे पणाचे लक्षण  असल्याची  प्रखर टीका काँग्रेसचे  प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी (Pune) केली. 
 गोपाळ तिवारी हे कॉंग्रेसने महाराष्ट्र राज्यासाठी नेमलेले प्रवक्ते आहेत. त्यांनी नरेंद्र मोदींवर खरमरीत टीका करत असताना पुढे सांगितले की,  डॉ. मनमोहन सिंग यांच्या युपीए 1 आणि 2 काळात देशातील २६ कोटी जनता ‘दारिद्र्यरेषेच्या बाहेर’ आली आणि त्यांच्या सरकारच्या काळातच देशाची आर्थिक महासत्ता बनण्याकडे वाटचाल सुरु झाली होती.  ही खरी  वास्तविकता असतांना  गेल्या  ७० वर्षात  पहिल्यांदाच  खाजगी  उद्योगपतींचे उच्चांकी कर्ज माफ केले. तसेच, गेल्या ७० वर्षात  उच्चांकी बँक घोटाळे  करून आपल्या सार्वभौम देशाचे कधीही न भरून येणारे आर्थिक नुकसान  करून  भाषणजीवींचा मित्र परिवार पसार झाला.

Supreme court : ‘आप’ चे खासदार संजय सिंग यांना जामीन मंजूर

ज्या ‘मोदी सरकारच्या काळात’ आरबीआय च्या ‘गंगाजळीस पहिल्यांदा नोट बंदीच्या माध्यमातून ‘अब्जावधींचा काळा पैसा सफेद होऊन’ (इति – सुप्रिम कोर्ट) देशाच्या अर्थव्यवस्थेच्या पाठीत सुरा खुपसणारे व देशाशी प्रतारणा करणारे कुटील कृत्य केले. त्यांनी या विषयी बोलावे म्हणजे ‘सौ चुहे खाकर बिल्ली चली हज को’ म्हणी प्रमाणे आहे.  या धादांत खोटेपणाची  निर्लज्ज राज्यकर्त्यांना थोडी ही नैतिक पातळीवर  भिती  वाटत नाही.
देशाच्या सार्वजनिक संपत्तीची लूट करणे, जनतेस महागाईच्या व बेरोजगारीच्या खाईत ढकलणे, देशातील तरुणांना रोजगारीच्या नावावर विदेशात गुलाम म्हणून जाऊ देणे या भयानक वास्तवास मोदी सरकार बगल देत असून, शिताफीने  खोट्या जाहिरातींच्या नावाखाली सतत खोटा आभास निर्माण करण्याचा निंद्य प्रयत्न करत आहे. नुकतेच भाषणजीवी  प्रधानसेवकांनी “एक भी भ्रष्टाचारी को छोडुंगा नही”..(?) हे वक्तव्य केल्याचे जनतेने पाहिले असून  त्या सर्व भ्रष्टाचाऱ्यांना मोदी शहांच्या  विकसित भाजपचे लक्ष्य असल्याची प्रतिती देखील देशवासियांना रोज येत असल्याचे प्रतिपादन  गोपाळ तिवारी यांनी केले.
धादांत खोटे बोलणे व दिशाभूल करणे हाच मोदी सरकारचा एकमेव अजेंडा असून ‘लातों के भूत बातोंसे नही मानते’ या उक्ती प्रमाणे मोदी – शहांच्या प्रयोगशाळेतील “भ्रष्टाचारास राजमान्यता देणाऱ्या ‘विकसित भाजप”ला निवडणूक प्रक्रियेद्वारे धक्के मारुन सत्तेवरून खाली खेचणे आवश्यक असल्याचे आवाहन देखील गोपाळ तिवारी यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.