Talwade: हयगयीने रिक्षा चालवल्याने झालेल्या अपघातात चालकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – बेदरकारपणे रिक्षा चालवत जात असताना रिक्षावरील नियंत्रण (Talwade)सुटल्याने रिक्षा पलटी झाली. यामध्ये रिक्षा चालकाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. 31) दुपारी तीन वाजताच्या सुमारास भारत वजन काट्यासमोर तळवडे येथे घडली.
शिल्पकार अंगद राऊत (वय 31, रा. तळवडे गाव) असे मृत्यू झालेल्या रिक्षा चालकाचे (Talwade)नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार बळीराम चव्हाण यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिल्पकार राऊत याने त्याच्या ताब्यातील रिक्षा (एमएच 14/केयु 0492) हयगयीने आणि बेदरकारपणे चालवली. त्यामुळे त्याचे रिक्षावरील नियंत्रण सुटले आणि भारत वजन काट्यासमोर तळवडे येथे रिक्षा पलटी झाली. या अपघातात शिल्पकार राऊत हा गंभीर जखमी झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.