Pune : उंदीर चावल्यामुळे रुग्णाचा मृत्यू, नातेवाईकांचा आरोप; रुग्णालयाचा नकार

एमपीसी न्यूज- पुण्यातील ससून रुग्णालयात एक तरुणाला उपचारासाठी दाखल(Pune) करण्यात आले होते. त्याला आय सी यु मध्ये उंदीर चावला. त्यानंतर या तरुणाची प्रकृती खालावत जाऊन या तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप तरुणाच्या नातेवाईकांकडून करण्यात आला आहे.

सागर रणुसे असे मृत्यू झालेल्या रुग्णाचे नाव आहे. 15 तारखेला सागर चां दुचाकी चालवत असताना अपघात झाला होता. त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. तसचं 25 तारखेला त्याच्यावर शस्त्रक्रिया पार पडली होती.

 

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीत माझा फोटो, नाव कुणीही वापरू नये- मनोज जरांगे पाटील

सागर याला आय सी यू विभागात दाखल करण्यात आलं मात्र त्याची प्रकृती ढासळत गेली आणि अखेर त्याचा मृत्यू झाला आहे.

नातेवाईकांनी आय सी यू मध्ये सागर याला उंदीर चावला आणि त्याचा मृत्यू झाला असा आरोप केला असुन मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार दिला आहे. या आरोपात काही तथ्य नसल्याचे ससून रुग्णालय प्रशासन ने स्पष्ट केले आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.