Today’s Horoscope 26 April 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज –  Today’s Horoscope 26 April 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य
आजचे पंचांग
आजचा दिवस – शुक्रवार.
तारीख – 26.04.2024.
शुभाशुभ विचार – शुभ दिवस.
आज विशेष – सामान्य दिवस.
राहू काळ – सकाळी 10.30 ते12.00.
दिशा शूल – पश्चिमेस असेल.
आज नक्षत्र – अनुराधा.
चंद्र राशी – वृश्चिक.
—————————–
मेष- ( शुभ रंग- डाळिंबी)
नवीन व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी आज दिवस अनुकूल नाही. मोठे आर्थिक व्यवहार उद्यावरच ढकला. नास्तिकांची ही पावले आज देवधर्माकडे वळतील.
वृषभ (शुभ रंग- पांढरा )
सगळी महत्त्वाची कामे आज दिवसाच्या पूर्वार्धातच उरकून घ्या. संध्याकाळी आर्थिक व्यवहार जपून करा. भागीदारीच्या व्यवहारात पारदर्शकता असलेली बरी.
मिथुन (शुभ रंग – मरून)
नोकरदारांवर वरिष्ठांची कृपादृष्टी राहील. आज तब्येत थोडी नरमच राहील. जुनी दुखणी अंगावर काढू नका. पती-पत्नी मधील काही मतभेद आज सामंजस्याने मिटू शकतील.
कर्क ( शुभ रंग- चंदेरी) 
तुमच्या प्रामाणिक मेहनतीस आज दैवाची उत्तम साथ लाभेल. स्वतःचे छंद जपण्यासाठी वेळही काढू शकाल. तुमच्या कामातील उत्साहाचा विरोधकांनाही हेवा वाटेल.

सिंह ( शुभ रंग- राखाडी)
व्यापार उद्योगास पूर्ववत गती येईल. कार्यक्षेत्रात आपली मते इतरांना पटवून देता येतील. आज स्थावराचे व्यवहारही लाभ देतील. मातोश्रींचे सल्ले महत्वपूर्ण असणार आहेत.
कन्या (शुभ रंग- लाल)
आज जुन्या ओळखीतून काही व्यवसाय वृद्धीच्या संधी येतील. केवळ चर्चेपेक्षा झटपट निर्णय घेणे अवश्यक राहील. गृहिणींना आज माहेरीची ओढ लागेल.

 

तूळ (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
धंद्यात काही येणे अनपेक्षित पणे वसूल होइल. गोड बोलून आज तुम्ही तुमच्या विरोधकांनाही आपली मते पटवून द्याल. नाती जपायची असतील तर सल्ले देऊ नका.
वृश्चिक ( शुभ रंग- आकाशी) 
तुमचा लहरी व संशयी स्वभाव नियंत्रणात ठेवा. महत्त्वाच्या चर्चेत इतरांचेही म्हणणे ऐकून घ्या. समोरची व्यक्ती आपल्यापेक्षाही हुशार असू शकते याचे भान असू द्या.
धनु (शुभ रंग- गुलाबी)
हाती असलेल्या पैशाची उधळपट्टी करू नका. कदाचित आज एखादा  मोठा खर्च उद्भवेल की जो टाळता येणार नाही. घरातील थोरामोठ्यांच्या शब्दाला मान द्या.
मकर (शुभ रंग- निळा)
आज कार्यक्षेत्रातील काही मनाजोगत्या घटना तुमचा आत्मविश्वास वाढवतील. खोटी स्तुती करणाऱ्या लोकांपासून मात्र दूर राहा. आज विरोधकही मैत्रीचा हात पुढे करतील.
कुंभ ( शुभ रंग- भगवा)
नोकरीच्या ठिकाणी प्रमोशनची चाहूल लागेल. अधिकार योग चालून येतील. वडील आज योग्य सल्ले देतील. सकारात्मक दृष्टिकोन बाळगा. कर्तव्याला प्राधान्य द्या.
मीन ( शुभ रंग- मोरपंखी)
नोकरदारांचे वरिष्ठांशी काही किरकोळ मतभेद होऊ शकतात. आज हातचे सोडून पळत्या मागे धावायचा मोह होईल पण तो टाळा. झटपट लाभाचाही मोह टाळायला हवा. संयम ठेवा.
शुभम भवतु
श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार 
9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.