Pimple gurav: गझलपुष्प जीवन गौरव पुरस्कार व गझलसंध्या गझल संगीत मैफिलीचे आयोजन

एमपीसी न्यूज -गझलपुष्प कला साहित्य सामाजिक सांस्कृतिक संस्थेतर्फे गझलसम्राट (Pimple gurav)सुरेश भट जयंतीनिमित्त महाराष्ट्रातील प्रतिथयश, ज्येष्ठ गझलकार ए. के. शेख यांना स्व. सुदामदादा नामदेव कराळे स्मरणार्थ गझलपुष्प जीवन गौरव पुरस्कार रविवार दिनांक 28 एप्रिल 2024 रोजी प्रदान करण्यात येणार आहे.

 

या कार्यक्रमाचे अध्यक्ष असणार आहेत राजन लाखे (अध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद चिंचवड) तर ज्येष्ठ गझलकार म. भा. चव्हाण, शब्दधन संस्था अध्यक्ष सुरेश कंक व प्रसिद्ध उद्योजक सुनिल कराळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

 

Talegaon :कलापिनी कलामंडळ 2024-25 चा शुभारंभ संकर्षण कऱ्हाडेच्या ‘नियम व अटी लागू’ या नाटकाने

या पुरस्कार प्रदान सोहळ्यानंतर गझलसंध्या हा मराठी गझलांचा भावरम्य स्वराविष्कार सादर होणार आहे. या गझल संगीत मैफिलीमध्ये गझलपुष्प संस्थेतील गझलकारांच्या गझला सादर होणार आहेत. ख्यातनाम गझल गायक डॉ. राजेश उमाळे (अमरावती) ही मैफिल सादर करणार आहेत. त्यांना साथसंगत करणार आहेत तबलावादक धिरेंद्र गावंडे, हार्मोनियम वादक ऋषीकेश दुधाळे, व्हायोलिन वादक प्रमोद जांभेकर.

 

या संगीत मैफिलीचे व पुरस्कार सोहळ्याचे निवेदन करणार आहेत गझलकार, निवेदक दिनेश भोसले. नटसम्राट निळू फुले नाट्यगृह पिंपळे गुरव याठिकाणी रविवार दिनांक 28 एप्रिल 2024रोजी संध्याकाळी4:30 ते 8:00 या वेळेत हा सोहळा संपन्न होणार आहे. रसिकांनी या सोहळ्याला उपस्थित राहून सोहळ्याचा व सुंदर संगीत मैफिलीचा आस्वाद घ्यावा.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.