Pimple Gurav : इंद्रायणी नदीतील मृत माशांना वाहिली श्रद्धांजली

एमपीसी न्यूज – इंद्रायणी नदी प्रदूषणामुळे नदितले जलचर मृत होत आहेत. सातत्याने होणाऱ्या या (Pimple Gurav )घटनांबाबत प्रशासनाला जाग यावी तसेच महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने याकडे लक्ष द्यावे यासाठी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 
दिलासा संस्था, मानवी हक्क संरक्षण आणि जागृती, पर्यावरण संवर्धन समिती पिंपरी चिंचवड या संस्थांच्या वतीने पिंपळे गुरव येथील गणेश विसर्जन घाटावर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
यावेळी पर्यावरण तज्ञ तानाजी एकोंडे, सामाजिक कार्यकर्ते नारायण कुंभार, सुरेश कंक, (Pimple Gurav )अण्णा जोगदंड, सुभाष चव्हाण, ईश्वर चौधरी, सागर पाटील, राम डुकरे, श्रीकांत चौगुले, राजेंद्र पगारे, कैलास बहिरट, रवींद्र कंक, शामराव सरकाळे, अरुण परदेशी, कुमार भरत, शंकर कुंभार, सुभाष चव्हाण, अरुण पवार, रवींद्र तळपाळे, प्रकाश घोरपडे, अशोक गोरे, योगिता कोठेकर, संगीता झिंजुरके, नारायण कुंभार, जयश्री गुमासे, चांगदेव गरजे, बाळासाहेब साळुंखे, संजय गमे, मुलानी महम्मद शरीफ, प्रकाश वीर, प्रकाश बांडेवार, मुरलीधर दळवी, रामराव दराडे, शंकर नानेकर आदी उपस्थित होते.
इंद्रायणी नदी प्रदूषण ठिकठिकाणी वाढत आहे. आळंदी येथे इंद्रायणी अनेक दिवसांपासून फेसाळत असतानाच देहू येथे नदी प्रदूषणामुळे नदीतील मासे मृत झाल्याची घटना 13 मार्च रोजी घडली.

Pimpri : महाराष्ट्रातील विणकर समाज आर्थिक विकास महामंडळास शासनाची मंजूरी; भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले महायुती सरकारचे आभार

इंद्रायणी नदीत आजवर वाम, मरळ, चीलापी असे मासे आजवर आढळत होते. मात्र 13 मार्च रोजी मृत झालेल्या माशांमध्ये देवमासे देखील मरण पावले. इंद्रायणी नदी पात्रात ठिकठिकाणी जलपर्णी वाढली आहे. तिथे माशांना पाण्याच्या वरच्या भागात येता येत नाही. त्यामुळे मासे जलपर्णी कमी असलेल्या ठिकाणी येतात. मात्र अशा ठिकाणी देखील पाणी दूषित झाले आहे.
इंद्रायणी नदीच्या पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले आहे. तसेच नायट्रोजनचे प्रमाण अनेक पटींनी वाढलेले आहे. हा नायट्रोजन जलचरांच्या आरोग्यासाठी धोकादायक असतो. नायट्रोजनमुळे या पाण्यात माशांचा जीव जात आहे.
पाण्याचे प्रदूषण कमी करण्यासाठी प्रशासनाने काम करायला हवे. त्यासोबत नागरिकांनी देखील पाणी प्रदूषित होणार नाही याची खबरदारी घ्यायला हवी. माशांच्या अनेक जाती पाण्यातील विषारी घटक खात असतात. पण विषारी घटकांचे प्रमाण हल्ली खूप वाढल्याने या माशांच्या जाती नामशेष होऊ लागल्या आहेत. त्यामुळे जलचरांप्रती प्रत्येकाने सद्भावना व्यक्त करणे आवश्यक असल्याचे मत श्रद्धांजली सभेत व्यक्त करण्यात आले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.