Alandi: देव, धर्म व गुरु यांचे विषयी चिंतन करण्याची गरज – प.पू. प्रवीणऋषीजी म.सा. यांचे आवाहन

एमपीसी न्यूज -आपण देव, धर्म व गुरू यांच्या विषयी काय करतोय याविषयी(Alandi) आता चिंतन करण्याची गरज आहे. आपण आत्ता अशा भूमीत आहोत की जेथे संत ज्ञानेश्वरांनी स्वतःकरीता काय केले ते, ते स्वतः जाणोत. परंतु विश्वाकरिता काय केले हे सर्वांनाच माहित आहे.
पसायदानात सुद्धा त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना स्वतःकरीता काहीच मागितले नाही. जी काही इच्छा केली ती धर्म व समाजाकरीता केली. आपण सर्वांनी त्या विचारांचा अंगीकार करण्याची आज नितांत गरज आहे.
भगवान महावीर, संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज यांनी समाजाला (Alandi)परमात्म्याशी जोडण्याचे महान कार्य केले व त्यामुळे आज एक परंपराच काय तर वारकरी सांप्रदायाची मांदियाळीच तयार झाली. त्यामुळे फक्त स्वतःलाच परमात्म्याशी जोडण्याऐवजी अखंड समाजाला परमात्म्याशी जोडण्याचे काम सर्वांनी करावे असे आवाहन प.पू. प्रवीणऋषीजी म.सा. यांनी केले.

 

PCMC : महापालिकेच्या  सफाई सेवकांकडून मतदानाची शपथ

समाजातील प्रेमभाव, कृतज्ञता व परमार्थ वृद्धिंगत व्हावे म्हणून द्वेष, कृतघ्नपणा व स्वार्थ याने माणसाचे कसे नुकसान होते हे भगवान महावीर व ज्ञानेश्वर माऊलींच्या जीवनातील प्रसंगांचे दाखले देत पटवून दिले.
महाराष्ट्राची पवित्र भूमी आळंदी नगरीमध्ये जैन धर्माचे धर्मगुरू उपाध्याय प.पू. प्रवीणऋषीजी म.सा. व तीर्थेशऋषीजी म.सा. यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. याप्रसंगी मोठ्या संख्येने जिल्हाभरातून अनेक जैन धर्मीय उपस्थित होते. बँड बाजाच्या जयघोषात, संतांच्या वेशभूषेतील विविध मुले-मुली भजनाच्या तालावर व नाटीकेच्या सादरीकरणातून मिरवणुकीत ठिकठिकाणी त्यांचे स्वागत करीत होते.
त्यानिमित्ताने फ्रुटवाला धर्मशाळेतील श्रीमान रसिकलाल धारीवाल सांस्कृतिक भवनात त्यांच्या प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रवचनानंतर ज्योती चोरडिया व सहकारी कलाकार यांनी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या जीवनावर आधारित सादर केलेल्या नाटिकेने व त्यावर तनिष्का वीर हिने केलेल्या हृदयस्पर्शी  निवेदनामुळे सर्व उपस्थित गहिवरले व भारावून गेले.
याप्रसंगी श्री श्वेतांबर स्थानकवासी जैन संघ पुणे चे अध्यक्ष पोपटलाल ओसवाल, सचिव अनिल नहार, विजयकांत कोठारी व इतर पदाधिकारी (जिल्ह्यातील विविध गावांचे संघपती), सदस्य तसेच आळंदी श्वेतांबर स्थानकवासी जैन संघाचे अध्यक्ष सुरेश वडगांवकर(कर्नावट), राजेंद्र धोका, सतीश चोरडिया, राजेंद्र लोढा, शाम कोलन, रमेश नवलाखा, शांतीलाल चोपडा, प्रमोद बाफना, सचिन बोरुंदिया, सागरमल बागमार, दिलीप नहार, श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगांवकर, विश्वस्त प्रकाश काळे, प्रविण मसालेवाले उद्योजक राजकुमार चोरडिया इत्यादी मान्यवर व जैन समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.
याप्रसंगी बाळासाहेब धोका, अनिल नहार, अशोककुमार पगारिया इत्यादींनी आपले मनोगते व्यक्त केली.

 

 

यानिमित्ताने सतीश चोरडिया व परिवार, राजेंद्र धोका व परिवार यांच्या वतीने गौतम प्रसादीचे (महाप्रसाद) आयोजन करण्यात आले होते.
यानिमित्ताने प.पू. प्रवीणऋषीजी महाराज यांनी वारकरी सांप्रदायाचे अध्वर्यु शांतीब्रह्म ह.भ.प. मारोती महाराज कुरेकर, ह.भ.प.डॉ. नारायण महाराज जाधव व आळंदी देवस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथदास यांची सदिच्छा भेट घेत धर्म व सामाजिक परिस्थितीवर विस्तृत चर्चा केली.
यानिमित्ताने त्यांनी आळंदीतील श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेस सदिच्छा भेट दिली. तेथे त्यांचा संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगांवकर यांनी सार्थ ज्ञानेश्वरी देऊन सन्मान केला. यावेळी सचिव अजित वडगांवकर, मुख्याध्यापक प्रदीप काळे व संस्था सदस्य तसेच जैन समाज बहुसंख्येने उपस्थित होता.
प्रवीण ऋषीजी महाराज व तीर्थेश ऋषीजी महाराज यांनी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी जवळ ध्यानधारणा केली.
रात्री आठ ते नऊ परमपूज्य तीर्थेश ऋषीजी महाराज यांनी सुश्राव्य  प्रवचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मीनल लोढा यांनी केले तर आभार रमेश नवलाखा यांनी मानले. पसायदान व महामांगलिकाने कार्यक्रमाची सांगता झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.