Maval LokSabha Election : तालमीत मतदार जनजागृती

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघातील फुगेवाडी येथील जय महाराष्ट्र कुस्ती संकुलात ( Maval LokSabha Election) मतदार जनजागृती करण्यात आली.  मूकबधिर पहिलवान आणि नवोदीत मतदार अक्षय पाटील यांच्याशी नोडल अधिकारी मुकेश कोळप आणि जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी सांकेतिक भाषेत संवाद साधला असता त्याने सांगली येथील पेठ इस्लामपूर येथे सकाळी जाऊन मतदान करणार असल्याचे सांगितले. त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावर प्रथमच मतदान करणार असल्याबाबत उत्साह आणि आनंद दिसून आला.

पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या नियंत्रणाखाली लोकसभा निवडणुकीसाठी आणि मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.दीपक सिंगला यांच्या निर्देशानुसार कार्यक्षेत्रात विविध जनजागृती पर कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. त्याअनषंगाने 206 पिंपरी विधानसभा कार्यालयाच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव यांच्या मार्गदर्शनाखाली 13 मे रोजी होणा-या मावळ लोकसभा निवडणुक मतदानासाठी आज विविध उपक्रमांद्वारे जनजागृती करण्यात आली.

Maval LokSabha Election : मतदान अधिकारी कर्मचारी यांना दुसरे प्रशिक्षण

मुंबई पुणे महामार्गावरील फुगेवाडी कार्यक्षेत्रात विविध सोसायट्या, व्यापारी केंद्रे, दुकाने,आयुष्मान आरोग्य केंद्र आदी विविध ठिकाणी मतदान मार्गदर्शिका वाटप करण्यात आल्या. या मतदान मार्गदर्शकेत भारत निवडणूक आयोगाचे विविध ॲप, मतदार नोंदणी,मतदार सहाय्यता क्रमांक, मतदानाची प्रत्यक्ष प्रक्रिया, तेथील प्रक्रियेची रचना, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती यांचेकरीता मतदान केंद्रांवर उपलब्ध सोईसुविधा,मतदानासाठी आवश्यक पुराव्यार्थ कागदपत्रे, टपाली मतदान यासह सविस्तर माहिती तसेच मतदान शपथेचाही समावेश आहे. फुगेवाडी येथील काही व्यापारी केंद्रांवर मतदान मार्गदर्शिकांचे वाटप करण्यात आले, त्यावेळी त्यांनीही येणा-या ग्राहकांना मार्गदर्शिकांचे वाटप करण्यात येईल तसेच मतदानासाठी जनजागृती केली जाईल असे सांगून लोकशाही उत्सवात सहभागी करून घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

रहाटणीतील मजूर अड्ड्यावर जनजागृती

चिंचवड विधानसभा मतदार संघात  रहाटणी फाटा येथील मजूर अड्डा येथे मतदार  जनजागृती कार्यक्रम  घेण्यात  आला.यावेळी तेथे उपस्थित असलेल्या मजूर मतदार नागरीक  यांना निवडणुकीत मतदान करण्या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. स्वीप टिमचे नोडल अधिकारी राजाराम सरगर व स्वीप व्यवस्थापन टीम यावेळी उपस्थित ( Maval LokSabha Election) होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.