Alandi : आळंदीमध्ये शरद पवार गट व अजित पवार गटाचा घरोघरी जाऊन प्रचार

 एमपीसी न्यूज –  लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आळंदीमध्ये (Alandi) महायुती व महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते घरोघरी जाऊन प्रचार करताना दिसत आहेत. राष्ट्रवादी (शरद पवार गट ),काँग्रेस, शिवसेना ( ठाकरे गट) हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांचा घरोघरी जात प्रचार करत त्यांचे तुतारी चिन्ह मतदारां पर्यँत पोहचवत  आहेत. तर भाजप,शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट) मित्रगट इतर पक्ष हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार शिवाजी आढळराव यांचा घरोघरी जात प्रचार करत त्यांचे घड्याळ चिन्ह मतदारांपर्यंत पोहचवत आहेत.

Pune : मतदानादिवशी पुण्यात पावसाची शक्यता

 शिरूर मतदार संघात 13 मे रोजी मतदान होत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गट उमेदवार डॉ .अमोल कोल्हे विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गट उमेदवार शिवाजी आढळराव पाटील असा सामना  शिरूर मतदार संघात रंगत आहे. याकडे सर्वसामान्य जनतेचे विशेष लक्ष आहे. सोशल मिडियाच्या माध्यमातून मतदारसंघातील व्हिडिओ वाॅर चर्चेचे विषय ठरत आहेत. सभा, सोशल मीडियाच्या  माध्यमातून रोप प्रत्यारोप होताना दिसून येत आहेत.मतदार संघात केलेली आपापली कामे दोन्ही उमेदवार जनतेपर्यंत पोहचवत आहे. तसेच मतदार संघात झालेल्या व होत असलेल्या कामांबाबत ते माहिती देताना दिसून येत (Alandi) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.