Pimpri : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर पिंपरीतील ग्रेड सेपरेटरमध्ये कंटेनर अडकल्याने वाहनांच्या रांगा

एमपीसी न्यूज – जुन्या पुणे मुंबई महामार्गावर पिंपरी येथे ग्रेड सेपरेटरमध्ये कंटेनर ( Pimpri ) अडकला. ही घटना बुधवारी (दि. 8) सकाळी घडली. कंटेनर अडकल्याने पुणे मुंबई लेनवर वाहनांच्या रांगा लागल्या.

 

याबाबत माहिती अशी की, एक कंटेनर जुन्या पुणे मुंबई महामार्गाने क्रेनचे साहित्य घेऊन जात होता. पिंपरी येथे आल्यानंतर हा कंटेनर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील ग्रेड सेपरेटर मध्ये अडकला. त्यामुळे वाहनांच्या लांबपर्यंत रांगा लागल्या.

 

Alandi : आळंदीमध्ये शरद पवार गट व अजित पवार गटाचा घरोघरी जाऊन प्रचार

 

वाहतूक पोलिसांना याबाबत माहिती मिळाली असता पिंपरी वाहतूक विभागाचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी कंटेनरच्या चाकातील हवा कमी करून कंटेनर पुढे घेतला. मात्र मोरवाडी येथील ग्रेड सेपरेटर मध्ये पुन्हा कंटेनर अडकला. दरम्यान, पोलिसांनी जुन्या पुणे मुंबई महामार्गावरील वाहतूक खराळवाडी येथून सेवा रस्त्याने वळवली.

 

महामार्गावरील वाहने सेवा रस्त्यावर आल्याने सेवा रस्त्यावरील वाहतूक मंदावली. कंटेनर बाजूला केल्यानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली ( Pimpri ) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.