Baramati : बारामतीत अनेक मतदारांची नावे मतदार यादीत आढळली नाहीत – रुपाली चाकणकर

एमपीसी न्यूज – बारामती लोकसभा  मतदारसंघात  काल सकाळपासून ( Baramati ) मोठं-मोठ्या घडामोडी घडल्या. त्याबाबत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याशी संवाद साधला असता त्या म्हणाल्या ,बारामतीमध्ये 60 टक्के मतदान झलेले आहे पण मतदानाचा आकडा वाढायला पाहिजे होता.  दरम्यान बुथवर अनेक मतदारांना त्यांची नावे मतदार यादीत आढळली नव्हती. पुढच्या निवडणुकीपर्यंत आम्ही या संदर्भात नक्की विचार करू.

Pimpri : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर पिंपरीतील ग्रेड सेपरेटरमध्ये कंटेनर अडकल्याने वाहनांच्या रांगा

रोहित पवार यांनी दत्ता भरणेबद्दल एक व्हिडिओ आपल्या सोशल मिडिया हँडलवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे.  व्हायरल व्हिडिओमध्ये दिसतंय की, ‘राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे हे एका व्यक्तीशी भांडत आहेत.

व्यक्तीला शिवीगाळ देखील केली जात आहे. तुम्हाला माझ्याशिवाय कोणी नाही. मलाच तुमच्या मदतीला यावं लागेल, अशाप्रकारची वक्तव्य ते करताना दिसत आहेत. याबद्दल रुपाली चाकणकर यांना विचारले असता त्या म्हणाल्या , दत्ता भरणे यांनी त्याबद्दल खुलासा केलेला आहे. एक कार्यकर्ता म्हणून फिल्डवर काम करत असताना समोरचा माणूस जर कोणी चुकीचा वागत असेल तर सहाजिकच त्या भावनांचा उद्रेक होतो.

रोहित पवारांविषयी बोलताना त्या म्हणाल्या, रोहित पवारांवर निवडणूक आयोगाने लक्ष ठेवावे. एक ते दीड महिन्यापासून रोहित पवार अशा प्रकारचे ट्विट करत आहे, त्यांची भावना ही नैराश्यातून आलेली आहे. माझी निवडणूक आयोगाला विनंती आहे सर्वात जास्त लक्ष रोहित पवारांवर ठेवा.

सुप्रिया सुळेंविषयी बोलताना त्या म्हणाल्या, काही चुकीचं जर होत असेल तर निवडणूक आयोगाच्या चौकटीत जाऊन न्याय मागावा.आधी ट्विट करतात मग त्याचा ड्रामा करतात. सुप्रिया सुळे यांनी त्या कार्यकर्ता त्यांना सांगायला हवं होतं तुम्ही आधी निवडणूक आयोगाला तक्रार करा.लोकांसमोर भावनिकता दाखवण्याचा त्यांचा ड्रामा ( Baramati )  आहे .

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.