Pune: बारामती – शिरूर लोकसभा निवडणूक अजित पवारांना वाटते तेवढी सोपी नाही

एमपीसी न्यूज – एकीकडे घरातल्या लोकांशी लढाई, दुसरीकडे शिवतारे (Pune)आणि हर्षवर्धन पाटील, अशा  चक्रव्यूहात उपमुख्यमंत्री अजित पवार अडकले आहेत. अजित पवार यांनी यापूर्वीच सांगितल्याप्रमाणे त्यांच्यासोबत पत्नी आणि दोन मुले वगळता कुटुंबातील कोणीही नाही, याचा प्रत्यय येवू लागला आहे. त्यांचे सख्खे बंधू उद्योजक श्रीनिवास, भावजय शर्मिला आणि पुतण्या युगेंद्र यांनी त्यांची साथ सोडली आहे. 

 

विजय शिवतारे यांनी अजित पवार यांच्या समोर आव्हान उभे केले आहे. (Pune)आपण बारामती लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनी केलेल्या टीकेची आठवण शिवतारे वारंवार करून देत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवतारे यांना युतीधर्म पाळावे लागणार, असल्याचे सांगितले. मात्र, शिवतारे यांची अद्यापही नाराजी कायम आहे.

Alandi: देव, धर्म व गुरु यांचे विषयी चिंतन करण्याची गरज – प.पू. प्रवीणऋषीजी म.सा. यांचे आवाहन

 

दुसरीकडे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी अद्यापही आपली भूमिका जाहीर केली नाही. 2019 च्या विधानसभा निवडणुकितील पराभव त्यांच्या जिव्हारी लागला आहे. नेमके पाटील कोणाला सहकार्य करणार, याची उत्सुकता लागली आहे.

 

सुप्रिया सुळे विरोधात सुनेत्रा पवार असा सामना रंगणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भोरचे माजी मंत्री अनंतराव थोपटे आणि आमदार संग्राम थोपटे यांच्या कुटुंबातील सदस्यांची सुनेत्रा पवार यांनी भेट घेतली. त्यानंतर लगेचच माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनीही थोपटे यांची घरी जाऊन तब्बेतीची विचारपूस केली. त्यामुळे यावेळी पवार यांनाही वाटते निवडणूक सोपी नाही.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.