Naigaon : जुन्या पुणे मुंबई महामार्गावर कारचा अपघात; दोघींचा मृत्यू

एमपीसी न्यूज – जुन्या पुणे मुंबई महामार्गावर कार पलटी होऊन अपघात ( Naigaon) झाला. या अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला. तर चार महिला जखमी झाल्या आहेत. हा अपघात शुक्रवारी (दि. 26) सकाळी कामशेत जवळ नायगाव येथे घडला.

सीताबाई तुकाराम लालगुडे (वय 58, रा. कुसगाव खुर्द, ता. मावळ), सिद्धी संतोष तिकोने (वय 18, रा. पाटण, ता. मावळ) अशी मृत्यू झालेल्या महिलांची नावे आहेत. रिद्धी संतोष तिकोने (वय 14, रा. पाटण, ता. मावळ), प्रियंका संग्राम भानुसघरे, सुभद्रा किसन भानुसगरे, लता किसन पिंजन या महिला जखमी झाल्या आहेत.

Pune : मेट्रोचे लोखंडी साहित्य चोरणाऱ्यांना अटक

प्रकरणी ऋषीनाथ तुकाराम लालगुडे (वय 43, रा. कुसगाव खुर्द, ता. मावळ) यांनी कामशेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कार चालक सुमित गुलाब पिंजन (वय 23, रा. कीनई, ता. मावळ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सुमित पिंजन हा त्याच्या ताब्यातील इनोव्हा कार जुन्या पुणे मुंबई महामार्गावरून घेऊन जात होता. तो कामशेत जवळ नायगाव येथे आला असता त्याचे कार वरील नियंत्रण सुटले आणि कार पलटी झाली. यामध्ये कारमधील दोन महिलांचा मृत्यू झाला. तर चार महिला जखमी झाल्या. कामशेत पोलीस तपास करीत ( Naigaon)  आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.