Actor Bernard Hill : हॉलीवूड अभिनेते बर्नार्ड हिल यांचे निधन

एमपीसी न्यूज – हॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते बर्नार्ड हिल ( Bernard Hill) यांचे वयाच्या 79 व्या वर्षी निधन ( Actor Bernard Hill) झाले. त्यांनी सन 1997 मध्ये आलेल्या प्रसिद्ध चित्रपट टायटॅनिक मध्ये कॅप्टन एडवर्ड जॉन स्मिथ तर सन 2002 मध्ये आलेल्या द लॉर्ड ऑफ द रिंग्स मध्ये थिओडन राजाची भूमिका साकारली होती. या त्यांच्या भूमिका अजरामर राहिल्या आहेत.

टायटॅनिक, द लॉर्ड ऑफ द रिंग्स याशिवाय त्यांनी बॉईज फ्रॉम द ब्लॅकस्टफ, शेअरली व्हॅलेंटाईन, द घोस्ट अँड द डार्कनेस, द स्कॉर्पिओन किंग्स अशा अनेक चित्रपटांमध्ये नावाजलेल्या भूमिका साकारल्या आहेत.

Talegaon : तळेगाव वाहतूक पोलिसांना संगणक संच भेट

बर्नार्ड यांना त्यांच्या अनेक भूमिकांसाठी विविध पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या निधनाच्या वृत्ताला बारबारा डिक्सन यांनी दुजोरा दिला. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत ही माहिती दिली. तसेच बर्नार्ड हिल यांच्यासोबत आपण सन 1974-75 मध्ये एक शो केल्याचेही आठवण देखील बारबारा डिक्सन यांनी सांगितली आहे.

टायटॅनिक आणि द लॉर्ड ऑफ द रिंग्स या दोन्ही चित्रपटांनी प्रत्येकी 11 ऑस्कर पुरस्कार जिंकले ( Actor Bernard Hill)  होते. त्या दोन्ही चित्रपटांचा बर्नार्ड हिल हे हिस्सा होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.