Wadgaon Sheri : माजी नगरसेविका शितल शिंदे यांचे निधन

एमपीसी न्यूज – पुण्यातील वडगाव शेरी येथील (Wadgaon Sheri )  भाजपच्या माजी नगरसेविका शितल ज्ञानेश्वर शिंदे (वय 41 ) यांचे बुधवारी रात्री अकरा वाजता निधन झाले. वडगाव शेरी येथून दोन वेळा निवडून आलेले माजी नगरसेवक ज्ञानेश्वर शिंदे यांच्या त्या पत्नी होत्या.

Today’s Horoscope 04 April 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

1 महिन्यापूर्वी अंगणातील पालापाचोळा सॅनिटायझर टाकून पेटवताना भडका झाल्याने त्या भाजल्या होत्या. त्यामुळे पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान मध्यंतरी त्यांची प्रकृती सुधारली होती. परंतु काही दिवसांपूर्वी त्यांना पुन्हा इन्फेक्शन झाल्याने त्यांची प्रकृती ढासळली व काल अखेर त्यांचे निधन ( Wadgaon Sheri ) झाले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.