Talegaon Dabhade : माजी नगरसेवक गोपाळ परदेशी यांचे निधन

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे नगर परिषदचे माजी नगरसेवक,(Talegaon Dabhade) आवाज न्युजचे संपादक, दुर्गामाता मंदिरचे विश्वस्त अध्यक्ष गोपाल दगडू परदेशी (वय 54) यांचे शनिवारी (दि.27) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगी,मुलगा, भाऊ,चार बहिणी असा परिवार (Talegaon Dabhade)आहे.गोपाळ परदेशी हे आमदार कृष्णराव भेगडे नागरी सहकारी पतसंस्थेचे खजिनदार म्हणून कार्यरत होते.ते नेहमीच हसतमुख,सदैव समाजातील विविध उपक्रमात सहभागी होणारे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते.

PCCOE : पीसीसीओईला ‘उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार’

आज सकाळी येथील बनेश्वर स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंतिमसंस्कार करण्यात आले.

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.